Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • “आमची गोठवलेली मालमत्ता सोडा नाही तर…”, इराणचा डोनाल्ड ट्रम्प यांना कडक इशारा, दिला 48 तासांचा अल्टिमेटम
Top News

“आमची गोठवलेली मालमत्ता सोडा नाही तर…”, इराणचा डोनाल्ड ट्रम्प यांना कडक इशारा, दिला 48 तासांचा अल्टिमेटम

Iran-US War | इराण (Iran) आणि अमेरिका (US) यांच्यातील शस्त्रसंधी भंग होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढला आहे. दोन्ही बाजूंमधील शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीची तारीख आणि वेळ अद्याप ठरलेली नाही. तेहरानच्या मते, याचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेने इराणी बंदरांवर घातलेली नाकेबंदी आणि 11 ट्रिलियन डॉलर्सच्या मालमत्तेवर केलेली जप्ती. त्यामुळे इराणने आता अमेरिकेला थेट धमकी दिली आहे.

हेही वाचा – पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान, गोंधळाच्या पार्श्वभूमीवरही विक्रमी टर्नआउट

इराणने अमेरिकेला नेमका काय दिला इशारा?

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. जर 48 तासांच्या आत तेहरानची मालमत्ता परत केली नाही, तर शस्त्रसंधी भंग केली जाईल, असा कडक इशारा अब्बास अराघची यांनी दिला आहे.

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, जोपर्यंत इराणची 11 ट्रिलियन डॉलर्सची गोठवलेली मालमत्ता सोडली जात नाही, तोपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहील. तसेच जर अमेरिकेने पुढील 48 तासांत प्रस्ताव सादर केला नाही तर शस्त्रसंधी संपुष्टात येऊ शकते, असं अब्बास अराघची यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा एकदा संघर्ष होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, जर आम्ही सामुद्रधुनी उघडली तर याचा अर्थ इराण दिवसाला 500 दशलक्ष डॉलर्स कमावेल. त्यामुळे जोपर्यंत या प्रकरणाचा निपटारा होत नाही तोपर्यंत इराणने दिवसाला 500 दशलक्ष डॉलर्स कमवावेत असं मला वाटत नाही. त्यामुळे, मीच ती बंद ठेवत आहे. त्यावर आमचे पूर्ण नियंत्रण आहे. जेव्हा इराण आमच्यासोबत एखादा करार करतील किंवा काहीतरी खूप सकारात्मक घडेल, तेव्हाच ती उघडली जाईल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts