CNG Price Hike | मागील काही दिवसांपासून सीएनजीच्या (CNG) दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. यामुळे वाहनचालकांना मोठा फटका बसत आहे. आताही सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज (26 मे) इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने (IGL) सीएनजीच्या दरात वाढ (CNG Price Hike) केली आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.
हेही वाचा – ट्विशा शर्मा केसला नवं वळण! CBI ने तपासाची सूत्रं घेतली हाती, पथक भोपाळमध्ये दाखल
सीएनजीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?
इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने आज पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ केली आहे. प्रति किलो 2 रूपयांनी सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मागील 11 दिवसांमध्ये चौथ्यांदा सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या बजेटला मोठा फटका बसला आहे. या वाढत्या महागाईचा परिणाम आता वाहतुकीवरही होण्याची शक्यता असून प्रवास खर्च वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आजच्या ताज्या दरवाढीनुसार, दिल्लीत 1 किलो सीएनजीचा दर 81.09 रुपयांवरून 83.09 रुपये झाला आहे. यापूर्वी आयजीएलने 23 मे रोजी सीएनजीच्या दरात 1 रुपयाने वाढ केली होती, त्यानंतर दिल्लीत सीएनजीचा दर 80.09 रुपयांवरून 81.09 रुपये प्रति किलो झाला होता. तर आज हा दर 83.09 रूपयांपर्यंत येऊन पोहोचला आहे. आज चौथ्यांदा सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सीएनजीच्या दरातील सततच्या वाढीचा परिणाम हा ऑटो-रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांच्या कमाईवर होत आहे.
दरम्यान, अमेरिका आणि इराण या देशांमधील तणावाचा परिणाम हा भारतावरही होताना दिसत आहे. मध्य-पूर्वेतील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक गॅस, तेलाचे जहाज होर्मुझ सामुद्रधुनीत अडकून पडले आहेत. त्यामुळे भारतावर याचा गंभीर परिणाम होत आहे. या तणावामुळे गॅस आणि इंधनाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ केली जात असून सर्वसामान्यांचे नुकसान होत आहे.











