• Home
  • राजकारण
  • नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक, नागपूर कनेक्शन उघड
Top News

नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक, नागपूर कनेक्शन उघड

gadkari 1

Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देण्यात आली होती. नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने सगळकीडे एकच खळबळ उडाली होती. अशातच आता नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) धमकी देणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

हेही वाचा – “ऑफिसमध्ये 5 मिनिटे नमाज अदा केली तर काय होतंय…”, अबू आझमींचा सरकारला सवाल, म्हणाले, मुस्लीमांचा छळ केला जातोय…

नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी? नेमकं प्रकरण कसं झालं उघड?

सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करून आपल्या नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील नांगलोई येथील रहिवासी असलेले व्यावसायिक आणि अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुमित कुमार चौहान हे 22 एप्रिल रोजी वैयक्तिक कामासाठी नागपूरला आले होते. ते नागपूरच्या यशवंत स्टेडियम परिसरात असताना त्यांनी सनातनी शेर नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून अपलोड केलेला एक व्हिडिओ पाहिला. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीने आक्षेपार्ह भाषा वापरत गडकरी आणि गडकरींच्या कुटुंबीयांना गंभीर धमक्या दिल्या होत्या.

या व्हिडीओसह आणखी एका वेगळ्या व्हिडीओमध्ये धार्मिक भावना भडकवणारी आणि विविध समुदायांमध्ये तणाव निर्माण करणारी विधाने होती. यानंतर सुमित कुमार चौहान यांनी धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

कोण आहे आरोपी?

हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपीची ओळख नागपूरच्या महालक्ष्मी नगर, मानेवाडा चौक येथील रहिवासी आयुष रमेश चंद्र अग्रवाल अशी पटवली. पोलीस तपासात असं उघड झालं की, हा व्हिडीओ नागपूरमधून पोस्ट करण्यात आला होता. आयुषने बनावट आयडी वापरून सोशल मीडियावर प्रक्षोभक मजकूर पोस्ट केला होता. तर या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आयुष अग्रवालवर गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts