Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • “ऑफिसमध्ये 5 मिनिटे नमाज अदा केली तर काय होतंय…”, अबू आझमींचा सरकारला सवाल, म्हणाले, मुस्लीमांचा छळ केला जातोय…
Top News

“ऑफिसमध्ये 5 मिनिटे नमाज अदा केली तर काय होतंय…”, अबू आझमींचा सरकारला सवाल, म्हणाले, मुस्लीमांचा छळ केला जातोय…

abu azmi

Abu Azmi | समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) नेते अबू आझमी (Abu Azmi) यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. अबू आझमी यांनी धर्मांतर आणि कायदा या मुद्द्यांवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात मुस्लिमांचा छळ केला जात आहे, असं मोठं वक्तव्य अबू आझमींनी केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाला अटक होणार? अजित पवार अपघात प्रकरणी जय पवारांचा खळबळजनक दावा, दिले मोठे संकेत

नाशिक प्रकरण बनावट? अबू आझमींचा खळबळजनक वक्तव्य

अबू आझमी यांनी नाशिकमध्ये 180 तरूणींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेवर भाष्य करत हे प्रकरण बनावट असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, मुस्लिमांना असमान वागणूक दिली जात आहे. पुणे, नागपूर आणि नाशिकसारख्या शहरांमध्ये सक्तीच्या धर्मांतराची कोणतीही घटना घडल्याचे वृत्त नाही. विशेषतः नाशिक प्रकरण हे बनावट असल्याचं अबू आझमी यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, मुस्लिमांचा छळ केला जात आहे आणि त्यांच्या रोजगारावर परिणाम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप अबू आझमींनी केला आहे.

नमाज अदा करण्याबाबत काय म्हणाले अबू आझमी?

पुढे अबू आझमी यांनी कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये नमाज अदा करण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, जर एखाद्या कर्मचाऱ्याने कार्यालयात पाच मिनिटे नमाज अदा केली तर त्यात काहीही हरकत नसावी. कंपन्यांमध्ये गणेशोत्सव किंवा इतर धर्मांचे सण साजरे केले जातात मग नमाजला विरोध का केला जातो? असा खोचक सवाल अबू आझमींनी उपस्थित केला आहे.

अमरावतीमध्ये पोलिसांनी आरोपी अयानची शहरातून धिंड काढल्यानंतर अबू आझमी यांनी कायद्यावर दुटप्पीपणाचा आरोप केला. अबू आझमी म्हणाले की, काही प्रकरणांमध्ये आरोपींवर त्यांची घरे पाडणे किंवा त्यांना धिंड काढण्यासारखी कठोर कारवाई केली जाते. तर इतर प्रकरणांमध्ये असं होत नाही. जर कोणी चूक केली असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे, पण सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे, असंही अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts