Iranian women’s dance : इराणविरुद्ध इस्त्राय- अमेरिका युद्धातून आता काही असे व्हिडिओ समोर येऊ लागलेत की खामेनेई मेल्याचा इराणी महिलांना आनंद झालाय का? असा प्रश्न तुम्हाला हे व्हिडिओ बघितल्यानंतर पडल्याशिवाय राहणार नाही. दोन दिवसांपूर्वी भारतातील मुस्लीम महिलांनी खामेनाई मेल्याच्या दु:खात रस्त्यावर उतरून आक्रोश व्यक्त केला. खामेनेईंना मारल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करताना त्यांनी अनेक खामेनाई पैदा होतील, असा इशारा दिला. मात्र, आता या व्हायर होणाऱ्या व्हिडिओ मागचं नेमकं कारण काय आहे. हेच आपण या लेखात पाहू..
हेही वाचा – युद्धाच्या रणधुमाळीत इराणचा मोठा निर्णय, अमेरिकेसोबत युद्ध सुरू असताना केली ‘ही’ मोठी घोषणा
काश्मीरपासून कर्नाटकपर्यंत विविध शहरांमध्ये मुख्यत शियापंथीय मुस्लिमांनी रस्त्यावर उतरून खामेनी यांच्या मृत्यूबद्दल शोक आणि संताप व्यक्त केला. समोर आलेल्या माहितीनुसार, जम्मू- काश्मीरच्या जम्मू, श्रीनगर, बारामुल्ला, बडगाम, बांदीपुरा, अनंतनाग आणि पुलवामा येथे मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले होते. यावेळी अमेरिका- इस्रायलविरोधी घोषणा देण्यात आल्या असून येथील महीलांनी आक्रोश केला.
इराणी महिलांनी केलजी व्हिडिओतून भारतीय महिलांची थट्टा
तर या महिलांना उत्तर देताना इराणी महिलांचा हा व्हिडिओ समोर आलाय. इराणी महिलांनी या व्हिडिओतून भारतीय महिलांची थट्टा केली आहे. पण त्यांचा सर्वोच्च नेता मेला असताना या महिला नेमक्या का नाचत असतील. का त्यांना एवढा आनंद झाला असेल याचा प्रश्न आता अनेकांना पडलाय. त्याला कारणीभूत इराणमधील शासनही असू शकतं.
इराणी महिलेने केस मोकळे सोडले म्हणून गोळ्या घालून हत्या
इराणमध्ये काही काळ आधी पाश्चमात्य संस्कृती पसरु लागली होती, त्याला आवर घालण्यासाठी खामेनेई यांना आणण्यात आलं. खामेनाई सत्तेत आल्यानंतर त्यांनी इथली पाश्चिमात्य संस्कृतीची पाळंमुळं उखलून फेकली. आणि इथं पूर्ण इस्लामी राजवट राहील असं जाहीर केलं. एवढंच नाही तर एका महिलेने केवळ केस मोकळे सोडले म्हणून गोळ्या घातल्याची घटना इराणमध्ये जगानं पाहिली. त्यामुळे खरंच एवढ्या कडक शासनाची गरज आहे का? असे अनेक सवाल जगभरातून विचारले जाऊ लागले.
महिलांना एवढ्या कठोर चालीरितींचं पालन करावं लागणार नाही
मात्र, आता युद्ध सुरू झाल्यानंतर इराणमध्ये अत्यंत भयानक परिस्थिती आहे. खामेनेईंच्या मृत्यूनंतर काही लोकांकडून आनंदही साजरा करण्यात येतोय. कारण काहींना आपल्या मनासारखं राहता येईल असं वाटतंय. तर कुणाला वाटतंय यापुढे कुणाच्या दबावाखाली राहावं लागणार नाही. महिलांना एवढ्या कठोर चालीरितींचं पालन करावं लागणार नाही, असं महिलांना वाटत असावं. त्यामुळे कदाचित हा आनंद साजरा केला जात असाव्यात. भारतीय खामेनेई समर्थक मुस्लीम महिलांची मात्र या व्हिडिओनं तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही.











