Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई पोहोचले रशियात; पुतीन यांनी विशेष विमान पाठवत दिला मदतीचा हात?
Top News

इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई पोहोचले रशियात; पुतीन यांनी विशेष विमान पाठवत दिला मदतीचा हात?

Mojtaba Khamenei In Russia | सध्या अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या तिन्ही देशांमध्ये युद्धाचा (War) भडका उडाला आहे. या तिन्ही देशांमधील युद्ध थांबण्याचं नाव घेत नसून ते दिवसेंदिवस जास्त पेटत चालले आहे. तर सुरूवातीला अमेरिका-इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर इराणची सर्व जबाबदारी अयातुल्ला अली खामेनेई यांचे सुपुत्र मोजतबा खामेनेई (Mojtaba Khamenei) यांच्याकडे सोपवण्यात आली आणि इराणचे सर्वोच्च नेते म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मोजतबा खामेनेई यांच्या सर्वोच्च नेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर अमेरिका-इस्त्रायलकडून आणखी एक हल्ला करण्यात आला होता, ज्यामध्ये मोजतबा खामेनेई जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता मोजतबा खामेनेई हे रशियात (Russia) असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – IKEA चा मराठमोळा अंदाज! स्टोअरमध्ये झळकवल्या पुणेरी पाट्या; सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

मोजतबा खामेनेईंसाठी विशेष विमान पाठवत रशियाने इराणला दिला मदतीचा हात?

मोजतबा खामेनेई यांना गुप्तपणे रशियाची राजधानी मॉस्को (Moscow) येथे नेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी स्वत: मोजतबा खामेनेईंसाठी विशेष विमान पाठवून इराणला मदतीचा हात दिला असल्याचा दावा केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून इराणवर हल्ला केला होता. या हल्ल्यात मोजतबा खामेनेई गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या पायाला आणि कंबरेला गंभीर जखम झाल्याने त्यांना शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची गरज होती. अशा कठिण परिस्थितीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी मोजतबा खामेनेई यांच्यासाठी विशेष विमान पाठवत त्यांना मॉस्कोमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल केले आहे, असा दावा कुवेती वृत्तपत्र ‘अल-जरीदा’ने केला आहे.

सध्या मोजतबा खामेनेई यांना गुप्तपणे मॉस्कोमध्ये आणण्यात आले असून त्यांना पुतिन यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच मोजतबा खामेनेई यांना कडक सुरक्षेत ठेवण्यात आले असून त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच या शस्त्रक्रियेत मोजतबा खामेनेईंचा पाय कापावा लागला असून त्यांनी आपला पाय गमावला असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच ही बातमी इराणच्या जनतेपर्यंत आणि लष्करापर्यंत पोहोचली तर त्यांचे मनोबल खचू शकते म्हणून इराण सरकारने ही माहिती दडवून ठेवली असल्याचंही म्हटलं जात आहे.

दरम्यान, दुसरीकडे इराण सरकारने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. “आमचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई हे पूर्णपणे निरोगी आहेत आणि ते इराणमध्येच आहेत”, अशी माहिती इराण सरकारकडून देण्यात आली आहे.

 

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts