Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Navratri Breakfast Recipe: चैत्र नवरात्रात रोज साबुदाणा खाऊन कंटाळलात? मग सकाळच्या नाश्त्यासाठी ट्राय करा हेल्दी अप्पे, लगेच नोट करा रेसिपी
Top News

Navratri Breakfast Recipe: चैत्र नवरात्रात रोज साबुदाणा खाऊन कंटाळलात? मग सकाळच्या नाश्त्यासाठी ट्राय करा हेल्दी अप्पे, लगेच नोट करा रेसिपी

Navratri Recipe

Navratri Recipe: चैत्र नवरात्राची सुरुवात झाली आहे. जर तुम्हाला साबुदाणा आवडत नसेल किंवा खाऊन कंटाळा आला असेल, तर हे हेल्दी आणि टेस्टी उपवासाचे अप्पे नक्की ट्राय करा

चैत्र नवरात्र सुरू होताच अनेक जण उपवास करतात, पण काही दिवसांनी रोजचा तोच साबुदाणा, बटाट्याचे पदार्थ किंवा तळलेले खाणे खाऊन कंटाळा येऊ लागतो. शिवाय जास्त तळलेले आणि जड पदार्थ खाल्ल्याने शरीराला सुस्ती येते आणि दिवसभर ऊर्जा कमी जाणवते. अशा वेळी चव आणि आरोग्य यांचा समतोल साधणारा पर्याय निवडणं गरजेचं ठरतं.

हेही वाचा: लिंबू की पुदिन्याचे पाणी? उन्हाळ्यात कोणतं आहे शरीरासाठी जास्त फायदेशीर

जर तुम्हाला उपवासात काहीतरी हलकं, पौष्टिक आणि वेगळं खायचं असेल, तर हेल्दी अप्पे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. कमी तेलात बनणारे, पोटभर आणि चविष्ट असे हे अप्पे तुमच्या सकाळच्या नाश्त्याला एक नवीन ट्विस्ट देतात. चला तर मग, ही सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

१ कप तांदूळ
½ कप साबुदाणा
१ लहान तुकडा आले
½ कप किसलेले पनीर
½ कप किसलेले गाजर
२ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
थोडी कोथिंबीर (चिरलेली)
सैंधव मीठ (चवीनुसार)
½ टीस्पून जिरेपूड
आवश्यकतेनुसार पाणी
अप्पे बनवण्यासाठी थोडे तेल किंवा तूप

शेंगदाणा-नारळ चटणी

एक कप भाजलेले शेंगदाणे घ्या. त्यात ताजे नारळ, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, सैंधव मीठ आणि जिरेपूड घाला. थोडं पाणी घालून बारीक वाटा. नंतर एका पॅनमध्ये थोडं तेल गरम करून त्यात जिरे आणि कढीपत्ता घालून फोडणी तयार करा आणि ती चटणीवर ओता.

कृती

तांदूळ आणि साबुदाणा वेगवेगळे धुऊन 2-3 तास भिजत ठेवा.

नंतर हे दोन्ही घटक आलेसह मिक्सरमध्ये टाकून थोडं पाणी घालून स्मूथ पेस्ट तयार करा.

तयार बॅटर एका भांड्यात काढून त्यात पनीर, गाजर, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ आणि जिरेपूड घाला.

सर्व मिश्रण चांगले एकजीव करून 10 मिनिटे झाकून ठेवा.

अप्पे पॅन गरम करून त्याला हलकं तेल लावा.

प्रत्येक साच्यात बॅटर घालून मंद आचेवर झाकण ठेवून 3-4 मिनिटे शिजवा.

एक बाजू सोनेरी झाली की अप्पे पलटून दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्या.

गरमागरम अप्पे नारळ किंवा शेंगदाणा चटणीसोबत सर्व्ह करा.

 

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts