Nitesh Rane | भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) हे त्यांच्या रोखठोख वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेच असतात. आताही ते त्यांच्या एका वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बकरी ईदच्या (Bakri Eid) पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी खळबळजनक विधान केलं आहे. त्यांनी बकरी ईदच्या दिवसी एआयवर (AI) बकरीचा आभासी बळी देण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे मुस्लिम संघटना संतप्त झाल्या असून राजकीय वातावरण तापलं आहे.
हेही वाचा – मराठी बोलायला येतं का? आता परप्रांतीय रिक्षाचालकांची झोप उडणार, 15 ऑगस्टनंतर प्रशासन थेट अॅक्शन घेणार
बकरी ईदवरून नितेश राणेंनी नेमकं काय केलं वक्तव्य?
राज्य सरकार बकरी ईदमुळे सुरक्षेची व्यवस्था करत आहे. यावरून नितेश राणेंनी मुस्लीम समाजाला बकरीचा आभासी बळी देण्याचा सल्ला दिला. हिंदू लोकांना जसं कोरडी होळी खेळण्याचा सल्ला दिला जातो, तसंच बकरी ईदलाही आभासी बकरीचा बळी द्या, असं मोठं वक्तव्य नितेश राणेंनी केलं आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
नितेश राणे म्हणाले की, हिंदू लोकांना कोरडी होळीच्या सणादिवशी म्हटलं जातं की, होळी पर्यावरणपूरक साजरी करा. कोरडी होळी खेळा. तसेच दिवाळी सणाला फटाके फोडू नका असे सल्ले दिले जातात. जर ते आपल्याला कोरडी होळी खेळायला सांगतात तर तुम्हीसुद्धा बकरी ईदला आभासी बकरीचा बळी देऊ शकता. बकरी ईद साजरी करायची आहे तर तुमच्या कॉम्प्युटरवर बकरीचा फोटो ठेवा आणि तिचा आभासी बळी दिला जात आहे, असं दाखवा आणि बकरी ईद साजरी करा, असा सल्ला नितेश राणेंनी दिला आहे.
नितेश राणेंनी दिलेल्या सल्ल्यानंतर मुस्लिम संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करत नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये AIMIM पक्षाचे नेते वारिस पठाण यांनी नितेश राणेंवर टीका केली. ते म्हणाले की, नितेश राणेंनी केलेलं हे वक्तव्य म्हणजे भाजपचा एक राजकीय डाव आहे. बकरीवर निर्बंध लादून भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका वारिस पठाण यांनी केली आहे.
दरम्यान, राज्य सरकारने बकरी ईद दिवशी बळीच्या जनावरांबाबत कठोर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. जे कोणी बकरी ईदच्या दिवशी गाय कत्तल करेल त्याच्यावर MCOCA अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल, असे आदेश सरकारने दिले आहेत. यापार्श्वभूमीवर मुंबईतील निवासी सोसायट्यांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. पोलीस सोसायट्यांमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करत आहेत जेणेकरून कोणीही कोणताही प्राणी बळी देण्यासाठी घेऊन जाणार नाही.










