Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • व्हाइट हाऊसवर गोळीबार करणारा हल्लेखोर सापडला, नेमका का केला गोळीबार? चौकशीत मोठा खुलासा
Top News

व्हाइट हाऊसवर गोळीबार करणारा हल्लेखोर सापडला, नेमका का केला गोळीबार? चौकशीत मोठा खुलासा

White House Firing | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे निवासस्थान व्हाईट हाऊस बाहेर शनिवारी (23 मे) गोळीबाराची (White House Firing) धक्कादायक घटना घडली. गोळीबाराच्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे व्हाईट हाऊसमध्येच उपस्थित होते. या घटनेमुळे संपूर्ण जगभरात एकच खळबळ उडाली आहे. तर सध्या व्हाईट हाऊस परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अशातच आता व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या गोळीबारातील संशयिताची ओळख पटली आहे.

कोण आहे व्हाइट हाऊसवर गोळीबार करणारा हल्लोखोर?

समोर आलेल्या माहितीनुसार, व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार करणाऱ्या आरोपीची ओळख पटली आहे. सुरक्षा दलांनी संशयित आरोपीला गोळ्या घालून ठार केले आहे. व्हाईट हाऊसवरील गोळीबारादरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रत्युत्तर म्हणून केलेल्या गोळीबारात संशयित आरोपी जखमी झाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

व्हाईट हाऊसबाहेरील सिक्रेट सर्व्हिसच्या तपासणी नाक्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराची ओळख मेरीलँडचा रहिवासी 21 वर्षीय नासिर बेस्ट म्हणून पटली आहे. नासिर बेस्टने आयझेनहॉवर एक्झिक्युटिव्ह ऑफिस बिल्डिंगजवळ 17 व्या स्ट्रीट आणि पेनसिल्व्हेनिया ॲव्हेन्यू NW च्या चौकात, व्हाईट हाऊस परिसराच्या जवळ सुमारे 30 गोळ्या झाडल्या होत्या.

नासिर बेस्टने व्हाइट हाऊसजवळ केलेल्या हल्ल्यामागील हेतूची अद्याप अधिकृतपणे पुष्टी झालेली नाहीये.  मात्र, बेस्ट मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं म्हटलं जातं आहे. तसेच नासिर हा व्हाइट हाऊसजवळील सुरक्षा तपासणी नाक्यांभोवती वारंवार फिरत होता आणि त्या परिसरात प्रवेश करण्यास मनाई करणाऱ्या पूर्वीच्या न्यायालयाच्या आदेशाचे कथित उल्लंघन केल्याबद्दल तो आधीच यूएस सिक्रेट सर्व्हिसच्या निगराणीखाली होता.

दरम्यान, नासिर बेस्टला याआधी 26 जून 2025 रोजी वॉशिंग्टनमधील 15 व्या स्ट्रीट आणि ई स्ट्रीट एनडब्ल्यू जवळ वाहनांच्या वाहतुकीत अडथळा आणल्याबद्दल अटक करण्यात आली होती.  तसेच 10 जुलै 2025 रोजीही त्याला पुन्हा अतिक्रमण केल्याबद्दल अटक करण्यात आली होती.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts