Breaking News :
  • Home
  • देश
  • वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये डिनर कार्यक्रमात गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले
Top News

वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये डिनर कार्यक्रमात गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले

वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये डिनर कार्यक्रमात गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले

Donald Trump : वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये रात्रीच्या जेवणाच्या वेळी गोळीबार झाला तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले. सिक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित ठिकाणी नेलं आणि त्यांना सुखरुप बाहेर काढलं. या हल्ल्यात कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गोळीबार करणाऱ्याला पकडले. तिथं उपस्थित असलेले उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स आणि ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनाही तात्काळ बाहेर काढण्यात आलं.

हेही वाचा  : बाळूमाचा अवतार सांगून, भोंदू बाबाकडून भाविकांची आर्थिक लूट

जेवणाच्या वेळी गोळीबार :

मिळालेल्या वृत्तानुसार व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनरच्या वेळी एका बंदूकधाऱ्यानं अचानक गोळीबार केल्यानं घबराट पसरली. घटनास्थळी असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद देत हल्लेखोराला ताब्यात घेतलं. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या पत्नी आणि इतर नेते व अधिकाऱ्यांसोबत या जेवणासाठी उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, हा गोळीबार अमेरिकेच्या वेळेनुसार रात्री 8:30 च्या सुमारास झाला.

ट्रम्प पहिल्यांदाच या कार्यक्रमासाठी उपस्थित :

राष्ट्राध्यक्ष म्हणून ते पहिल्यांदाच या जेवणासाठी उपस्थित होते. याच दरम्यान, एका व्यक्तीनं गोळीबार करत आत शिरण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी, तिथं उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला. या जेवणासाठी सुमारे 2600 लोक उपस्थित होते. गोळीबाराचा आवाज ऐकून लोक आपापल्या टेबलांखाली लपले.

ट्रम्प यांनी ‘ट्रुथ’ सोशल मीडियावर काय लिहिलं? :

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या संदर्भात ‘ट्रुथ’ सोशल मीडियावर पोस्ट केलं. त्यांनी लिहिलं, “डी.सी. मध्ये ही एक अद्भुत संध्याकाळ होती. सिक्रेट सर्व्हिस आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी उत्तम काम केलं. त्यांनी जलद आणि धैर्यानं कारवाई केली. गोळीबार करणाऱ्याला पकडण्यात आलं आहे, आणि मी ‘कार्यक्रम पुढे चालू ठेवावा’ असा सल्ला दिला आहे, परंतु कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणाच एकमेव मार्गदर्शक असतील. ते लवकरच निर्णय घेतील. तो निर्णय काहीही असो, ही संध्याकाळ नियोजित केलेल्यापेक्षा खूप वेगळी असेल आणि आपल्याला हे सर्व पुन्हा करावं लागेल.”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts