Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • “करार इस्लामाबादमध्ये झाला, तर मी तिथं जाईल”; डोनाल्ड ट्रम्प नेमकं म्हणाले?
ताज्या बातम्या

“करार इस्लामाबादमध्ये झाला, तर मी तिथं जाईल”; डोनाल्ड ट्रम्प नेमकं म्हणाले?

"जर इराणनं शस्त्रसंधी मोडली तर..."; ट्रम्प यांची पुन्हा धमकी

Iran US War : इराणसोबत सुरु असलेल्या शांतता प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. इस्लामाबादमध्ये करार झाल्यास, आपण पाकिस्तानला भेट देण्याचा विचार करु, असं ते म्हणाले. ट्रम्प यांनी गुरुवारी सांगितलं की, जर अमेरिका आणि इराण यांच्यात इस्लामाबादमध्ये अखेर शांतता करार झाला, तर ते पाकिस्तानला भेट देण्याचा विचार करतील.

हेही वाचा : वाल्मिक कराडची अचानक तब्येत खालावली; तातडीने रुग्णालयात केले दाखल, नेमकं

ट्रम्प यांच्या सांगण्यावरुन पाकिस्तानची मध्यस्थी :

ट्रम्प यांच्या सांगण्यावरून पाकिस्तान अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी करत आहे. व्हाईट हाऊस ते लास वेगास, नेवाडा इथं प्रवास करत असताना ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितलं, “होय, मी पाकिस्तानला जाऊ शकतो. इस्लामाबादमध्ये करार झाल्यास, मी जाऊ शकेन. मी तिथं जावं अशी त्यांची इच्छा आहे.” ट्रम्प यांनी अमेरिका-इराण चर्चेतील पाकिस्तानच्या भूमिकेचं कौतुक केलं आणि ती “अत्यंत रचनात्मक” असल्याचं म्हटलं. पाकिस्तानी मध्यस्थांनी “उत्कृष्ट” काम केलं आहे, असं ते म्हणाले. इराणसोबत सुरु असलेल्या चर्चेबद्दल ट्रम्प यांनी आशावाद व्यक्त केला आणि सांगितलं की लवकरच एका कराराची घोषणा केली जाऊ शकते, ज्याचे दूरगामी आर्थिक परिणाम होऊ शकतात.

इराण-अमेरिका करार लवकरच :

ट्रम्प म्हणाले, “मला वाटते की सध्या आमच्या चर्चा खूप यशस्वी होत आहेत. जर हे घडलं, तर त्याची घोषणा खूप लवकर केली जाईल. यामुळं आम्हाला मोफत तेल, होर्मुझची मुक्त सामुद्रधुनी मिळेल आणि सर्व काही चांगलं होईल. मला वाटते की तेलाच्या किमती सध्या आहेत त्यापेक्षाही कमी होतील.” ऊर्जा किमतींवर बोलताना ट्रम्प म्हणाले की, राजनैतिक प्रयत्नांमुळं इंधनाच्या किमती कमी होण्याची चिन्हं आधीच दिसत आहेत. अणुबॉम्बचा धोका लक्षात घेता, त्या फार जास्त नाहीत. ते म्हणाले की, गेल्या तीन-चार दिवसांत गॅसच्या किमती लक्षणीयरीत्या कमी झाल्या आहेत. महागाईवर बोलताना ट्रम्प म्हणाले, “मला या देशाच्या इतिहासातील सर्वाधिक किमती आणि सर्वात वाईट महागाईचा वारसा मिळाला आहे. मी ती खूप कमी पातळीवर आणीन, आणि ती अजूनही खूप कमी आहे.” इराण संघर्षासंदर्भात वाढलेल्या राजनैतिक हालचालींच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही टिप्पणी केली आहे.

मुनीर यांची इराणच्या संसद अध्यक्षांशी भेट :

दरम्यान, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर यांनी गुरुवारी तेहरानमध्ये इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांची भेट घेतली. रखडलेल्या अमेरिका-इराण चर्चा पुन्हा सुरु करण्यासाठी दोन्ही देशांमधील राजनैतिक प्रयत्न तीव्र झाले आहेत. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी तेहरानच्या अणुकार्यक्रमावर मोठ्या यशाची आशा व्यक्त केली आहे. जनरल मुनीर बुधवारी तेहरानमध्ये दाखल झाले, जिथं इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी त्यांचं स्वागत केले. चर्चेची पहिली फेरी अयशस्वी झाल्यानंतर, दुसऱ्या फेरीच्या तयारीसाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. युरेनियम संवर्धनावरील बंदीचा कालावधी आणि इराणच्या उच्च संवर्धित युरेनियमच्या साठ्याचं काय करायचं, हे प्रमुख वादग्रस्त मुद्दे आहेत.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts