Breaking News :
  • Home
  • Top News
  • मोदींच्या न्यूझीलंड दौऱ्याआधी भारतासाठी मोठी बातमी; व्यापार करारामुळे खुलणार आर्थिक संधींचे नवे दार
देश

मोदींच्या न्यूझीलंड दौऱ्याआधी भारतासाठी मोठी बातमी; व्यापार करारामुळे खुलणार आर्थिक संधींचे नवे दार

Narendra Modi

Narendra Modi: चार दशकांनंतर भारतीय पंतप्रधान न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, या ऐतिहासिक भेटीपूर्वीच भारतीयांसाठी एक मोठी आर्थिक गुड न्यूज समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर असून, इंडोनेशिया (Indonesia) आणि ऑस्ट्रेलियानंतर (Australia) ते आता न्यूझीलंडच्या (New Zealand) दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याआधीच भारत आणि न्यूझीलंडसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. दोन्ही देशांमधील नव्या व्यापार करारामुळे भारताच्या निर्यातीला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: फडणवीस, पवार आणि शिंदे… राऊतांच्या पत्रकार परिषदेत तिन्ही मुद्द्यांवर जोरदार टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूझीलंडला भेट देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी १० आणि ११ जुलै रोजी न्यूझीलंडला भेट देणार (Modi New Zealand visit) आहेत. तब्बल चार दशकानंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांचा हा न्यूझीलंड दौरा असणार आहे. त्यामुळे या भेटीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष लक्ष लागले आहे.

नव्या व्यापार करारानुसार भारताच्या सुमारे ५७ टक्के निर्यातीला करमुक्त प्रवेश मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे दोन्ही देशांच्या बाजारपेठ, उद्योग क्षेत्र आणि ग्राहकांना फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचे स्वागत केले आहे. भारत ही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून, न्यूझीलंडच्या आर्थिक विकासासाठी भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

फ्री व्यापार करार ठरणार आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा

भारत आणि न्यूझीलंड (India And New Zealand) यांच्यात एप्रिल महिन्यात फ्री व्यापार करारावर (Free Trade Agreement) स्वाक्षरी करण्यात आली होती. आता या कराराच्या अंमलबजावणीमुळे दोन्ही देशांमधील व्यापार वाढण्याची शक्यता आहे.

न्यूझीलंडच्या उद्योगांना भारताच्या मोठ्या बाजारपेठेत अधिक सहज प्रवेश मिळणार आहे. करमुक्त सुविधेमुळे न्यूझीलंडमधील अनेक उत्पादनांना भारतीय बाजारपेठेत पोहोचण्याची संधी मिळेल. यामुळे व्यवसायवाढ, रोजगार निर्मिती आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

न्यूझीलंडच्या पंतप्रधानांच्या मते, हा करार देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.

भारताच्या निर्यात क्षेत्रालाही मिळणार फायदा

हा व्यापार करार केवळ न्यूझीलंडसाठीच नव्हे, तर भारतासाठीही फायदेशीर ठरणार आहे. करारानुसार भारतीय उत्पादनांना न्यूझीलंडच्या बाजारपेठेत करमुक्त प्रवेश मिळणार आहे.

यामुळे भारतीय निर्यातदारांना प्रशांत क्षेत्रातील मजबूत अर्थव्यवस्थेत विस्तार करण्याची संधी मिळेल. कृषी, उत्पादन, सेवा आणि इतर क्षेत्रांमध्ये व्यापाराच्या नवीन शक्यता निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

भारत-न्यूझीलंड संबंधांना नवी दिशा

जागतिक व्यापार क्षेत्रात वाढत्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारत आणि न्यूझीलंडमधील हा करार महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक आणि धोरणात्मक संबंध आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या न्यूझीलंड दौऱ्याकडे केवळ राजनैतिक भेट म्हणून नव्हे, तर भविष्यातील व्यापार आणि सहकार्याच्या नव्या पर्वाची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts