191
रत्नागिरीच्या राजाचं आज साळवी स्टॉप ते मारुती मंदिर सर्कल दरम्यान ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि डीजेच्या तालावर जल्लोषात स्वागत करण्यात आलं. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत स्वतः शेवटपर्यंत उपस्थित होते. तरुणाईसह रत्नागिरीकरांनी मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात राजा महाराजाचं स्वागत केलं. आता राजा मारुती मंदिर सर्कलमध्ये विराजमान होणार आहे.









