Breaking News :
  • Home
  • Top News
  • पुण्यातील पोलिस ठाण्यात जुळलं प्रेम! दोन महिला पोलिसांचा ‘या’ तारखेला विवाह; सुट्टीच्या अर्जात काय लिहिलं?
Pune

पुण्यातील पोलिस ठाण्यात जुळलं प्रेम! दोन महिला पोलिसांचा ‘या’ तारखेला विवाह; सुट्टीच्या अर्जात काय लिहिलं?

Pune Women Police
4
Pune Women Police : पोलिसांच्या वर्दीत कर्तव्य बजावताना दोन महिला कर्मचाऱ्यांमध्ये मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि आता दोघींनी आयुष्यभराची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. 30 ऑगस्टला आळंदीत विवाहाची तयारी असून, सुट्टीच्या अर्जासोबत चक्क लग्नपत्रिकाही जोडण्यात आली आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

पिंपरी- चिंचवड, पुणे पोलीस दलातील दोन महिला कर्मचाऱ्यांनी (Pune Women Police Marriage) एकत्र आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला असून, ३० ऑगस्ट रोजी आळंदी येथे विवाद करण्याची तयारी केली आहे. दोघींनी विवाहासाठी सुट्टीचा अर्जही सादर केला असून, त्यासोबत लग्नपत्रिका जोडल्याने हा विषय पोलीस दलात चर्चेचा ठरला आहे.

पोलीस भरतीत झाली ओळख

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही महिला पोलिसांची ओळख पोलीस भरतीच्या काळात झाली. प्रशिक्षणानंतर त्यांची काही काळ मुख्यालयात नियुक्ती होती. त्यानंतर शहरातील एका पोलीस ठाण्यात दोघींची एकाच ठिकाणी नियुक्ती झाली.

हेही वाचा: मुंढे साहेब, चांगलं खायची सवय लावू नका! FDAच्या धडक कारवायांनंतर जनतेचा सवाल, बदली झाली तर पुढे काय?

एकत्र काम करताना त्यांच्यातील मैत्री अधिक घट्ट झाली. कालांतराने दोघींनी आपलं आयुष्य एकत्र घालवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या नात्याची माहिती कुटुंबियांना मिळाल्यानंतर त्यातील एका कुटुंबाकडून या निर्णयाला विरोध झाल्याची माहिती आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही दाद

कुटुंबीयांनी या नात्याला विरोध करत पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही भूमिका मांडल्याचं समोर आलं आहे. मात्र, हा दोन्ही प्रौढ व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित विषय असल्याने प्रशासनाकडून विवाह रोखण्याऐवजी परिस्थितीनुसार समुपदेशन करण्याची भूमिका घेतल्याचे सांगितलं जात आहे.

दरम्यान, दोन्ही महिला पोलिसांनी 30 ऑगस्ट रोजी आळंदी येथे वैदिक पद्धतीने विवाह (same sex marriage India) करण्याची तयारी केली आहे. यासाठी त्यांनी अधिकृत सुट्टीचा अर्ज दाखल केला असून, अर्जासोबत लग्नपत्रिकाही जोडली आहे.

समलैंगिक विवाहाबाबत कायदेशीर प्रश्न

भारतामध्ये समलैंगिक संबंध गुन्हा नाहीत. मात्र, समलैंगिक विवाहाला सध्या कायदेशीर विवाहाचा दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे या विवाहाची कायदेशीर नोंदणी आणि त्यातून निर्माण होणारे हक्क याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर या दोन्ही महिला पोलिसांचा निर्णय विशेष चर्चेत आला आहे.

लिंगबदलाच्या उपचारांचीही चर्चा

या दोघींपैकी एका महिला पोलिसाने लिंगबदलाशी संबंधित वैद्यकीय उपचार सुरू केल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र, या उपचारांचा प्रस्तावित विवाहाच्या कायदेशीर स्थितीवर नेमका काय परिणाम होईल, याबाबत सध्या स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.

एकीकडे दोन महिला पोलिसांनी आपल्या नात्याला पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे, तर दुसरीकडे लिंगबदलानंतर सरकारी सेवा नोंदींमध्ये बदल करण्याचे प्रश्नही प्रशासनासमोर येत आहेत. त्यामुळे बदलत्या सामाजिक वास्तवासोबत कायदा आणि सरकारी व्यवस्थेसमोरही नवे प्रश्न उभे राहत आहेत.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts