संस्कृतीची गोडी आता थेट वर्गात! गुजरात सरकारने 6वी ते 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी भगवदगीता अभ्यासक्रमात अनिवार्य केली आहे. 6-8वीत ‘सर्वांगी शिक्षण’ विषयातून तर 9-12वीत भाषेच्या पुस्तकांद्वारे गीतेचे श्लोक, कथा, नाट्य, क्विझ आणि रंगलेखन यांसारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना गीतेचे मूल्य आणि तत्त्वज्ञान शिकवले जाणार आहे.












