Sanjay Raut: आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात ‘जेन Z’ संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधणार आहेत. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (CM Devendra Fadanvis) आज (२३ ऑगस्ट २०२६) नागपुरात ‘जेन झेड’ मधील तरुणांशी संवाद साधणार आहेत. मात्र या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार टीका करत या संवाद कार्यक्रमावरच सवाल उपस्थित केला आहेत.
राऊत यांनी थेट टोला लगावत म्हटलं की, “मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अभिजित दिपके आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो लावले पाहिजेत. कारण या तरुणांमुळेच आता सरकारला जेन झेडच्या प्रश्नांची जाणीव झाली आहे.”
‘आधी पेड इव्हेंट म्हणालात, मग आता हा कार्यक्रम काय?’
जेन झेडच्या प्रश्नांवर सरकारकडून आता संवाद साधला जात असल्याच्या मुद्द्यावर राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली.
पुण्यात जेन झेडचा मेळावा झाल्यानंतर त्याला ‘पेड इव्हेंट’ म्हटल्याचा दावा करत राऊत यांनी सवाल केला की, “जर तरुणांचा तो कार्यक्रम पेड इव्हेंट होता, तर आता नागपुरात होणारा कार्यक्रम नेमका काय आहे?”विद्यार्थी, तरुण आणि त्यांच्या या आंदोलनांची खिल्ली उडवणे अत्यंत योग्य नाही असं राऊतांनी म्हटलं आहे.
‘लाडकी बहीण योजना म्हणजे काय?’ (Ladki Bahin Yojana)
या मुद्द्यावरून राऊत यांनी सरकारच्या योजनांवरही निशाणा साधला. ‘पेड इव्हेंट’ या शब्दप्रयोगावर आक्षेप घेत त्यांनी लाडकी बहीण योजनेपासून बिहारमधील आर्थिक मदतीपर्यंत विविध राजकीय मुद्दे उपस्थित केले.
“जर हा कार्यक्रम पेड इव्हेन्ट इव्हेंट आहे, तर मग निवडणुकीच्या काळातील आर्थिक मदतीचे जे कार्यक्रम घेतले गेले ते काय होते?” असा थेट प्रश्न करत राऊत यांनी भाजपवर मोठी टीका केली. (LS Marathi News)
पोषण आहाराच्या मुद्द्यावरूनही सरकारला घेरलं
दरम्यान, महाराष्ट्रातील पोषण आहाराच्या गुणवत्तेचा मुद्दाही संजय राऊत यांनी उपस्थित केला. आंबेगाव परिसरातील अंगणवाडीतील पोषण आहाराच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या सेविकेवर कारवाई झाल्याचा आरोप त्यांनी केला. Sanjay Raut Latest News
कच्चा वाटाणा आणि इतर धान्य अनेक वेळा कुकरमध्ये शिजवूनही योग्य प्रकारे शिजत नसल्याचा दावा करत संबंधित सेविकेने हा प्रकार समोर आणला होता. “समस्या दाखवणाऱ्या शिक्षिकेवरच कारवाई का?” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
पोषण आहाराचा पुरवठा करणारे संबंधित पुरवठादार कोण आहेत, त्यांच्या साहित्याची गुणवत्ता तपासली जाते का आणि निकृष्ट साहित्य आढळल्यास जबाबदारी कोणाची, याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. Devendra Fadanvis latest News
राऊतांच्या निशाण्यावर आता सरकार
एकीकडे जेन झेडसोबत संवाद साधण्याची तयारी, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांचे प्रश्न, पेपरफुटी आणि पोषण आहाराच्या गुणवत्तेसारखे मुद्दे यावरून राऊत यांनी सरकारला घेरलं आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नागपूरमधील जेन झेड संवाद कार्यक्रमात नेमके कोणते मुद्दे चर्चेला येतात आणि सरकार त्यावर काय भूमिका मांडते, याकडे आता राजकीय वर्तुळासह तरुणांचंही लक्ष लागलं आहे.




