कॅनडातील सरे येथील कपिल शर्मा यांच्या कॅफेवर एक महिन्याच्या आत दुसऱ्यांदा गोळीबार करण्यात आला आहे. यामुळे कॅफे परिसरात मोठ्या प्रमाणावर दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध स्टार कपिल शर्माच्या कॅफेवर झालेल्या या हल्ल्याची कॅनडाच्या पोलिसांनी गंभीरतेने दखल घेतली आहे.












