Alexander Palmer : एका मोठ्या हेरगिरी प्रकरणात सुरक्षा यंत्रणांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. या खुलाशांमुळे वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. २१ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने “अलेक्झांडर पामर” नावाच्या एका व्यक्तीला अटक केली, जो स्वतःची शास्त्रज्ञ आणि आंतरराष्ट्रीय पत्रकार म्हणून ओळखत सांगत होता. तपासात त्याचे खरे नाव अकबर कुतुबुद्दीन हुसैनी असल्याचे आणि तो परदेशी नागरिक असल्याचे उघड झाले. यासोबतच पाकिस्तान सोबत जोललेले एक सिमकार्ड त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहे.
आरोपीकडून अनेक बनावट भारतीय कागदपत्रे जप्त करण्यात आली. देशातील अनेक उच्च तपास संस्था या प्रकरणात एकत्र काम करत आहेत. इंटेलिजेंस ब्युरो (IB), RAW, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (MI), दिल्ली पोलिस स्पेशल सेल, मुंबई गुन्हे शाखा आणि झारखंड पोलिस आरोपीची चौकशी करत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने भारतात बनावट पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि इतर सरकारी कागदपत्रे मिळवून स्वतःला भारतीय नागरिक म्हणून स्थापित करण्याचा प्रयत्न केला. तो बऱ्याच काळापासून मुंबईतील अंधेरी येथील जुहू-सौर बेट परिसरात एका फ्लॅटमध्ये राहत होता. अटकेच्या वेळी त्याची पत्नी आणि मुलगाही तिथे उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञाची बनावट ओळख (Alexander Palmer)
अकबर हुसेनीने भारतात अलेक्झांडर पामरची ओळख धारण केली. त्याने बनावट पासपोर्ट, पॅन कार्ड आणि आधार कार्ड तयार केले. तो आंतरराष्ट्रीय पत्रकार आणि शास्त्रज्ञ असल्याचे भासवून मोठ्या संस्थांमध्ये सक्रिय राहिला. त्याच्या अपार्टमेंटमधून बनावट ओळखपत्रे, परदेशी प्रवासाची कागदपत्रे, अनेक मोबाईल फोन आणि उपकरणे जप्त करण्यात आली.
अलेक्जेंडर पालमर निकला अकबर हुसैनी! साइंटिस्ट बनकर घुसा था दुश्मन का एजेंट, जासूसी कांड में बड़ा खुलासा
पत्नी और बच्चो के सामने हुआ ख़ुलासा pic.twitter.com/257KfBZBlo
— Indian 🇮🇳 (@AmitTiw73779776) October 30, 2025
पाकिस्तान नेटवर्कशी जोडलेले मोबाईल फोन सापडला
तपास संस्थांनी त्याच्याकडून अनेक सिम कार्ड आणि नंबर जप्त केले, त्यापैकी एक पाकिस्तान नेटवर्कशी जोडलेले होते. त्याच्या आयएमएसआय कोड आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शनची चौकशी सुरू आहे. कोटक महिंद्रा बँकेत एक एनआरआय खाते, एक एसबीआय क्रेडिट कार्ड आणि अनेक कंपन्यांचे बनावट व्यवस्थापकीय प्रमाणपत्र जप्त करण्यात आले. तो नाशिक एमआयडीसीमधील एचएमएल कॉर्पोरेशनमध्ये काम करत असल्याचे त्याने नोंदवले होते.
लंडन विद्यापीठाचे बनावट शैक्षणिक कागदपत्र( Alexander Palmer )
टाटा हार्डवेअर आणि परदेशी विद्यापीठांच्या नावावर बनावट प्रमाणपत्रे देखील आढळली. २००० ते २००९ दरम्यान मिळवलेले लंडन विद्यापीठाचे बनावट एमबीए प्रमाणपत्र देखील सापडले. त्याच्या साथीदार मुझफ्फरकडून ४८ परदेशी चलनाच्या नोटा आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला. चौकशीत असे दिसून आले की बनावट पासपोर्ट २०१९ मध्ये जमशेदपूरमधील एका एजंटच्या मदतीने मिळवला होता. त्याच्या १०वी, १२वी, बीएससी (गणित), बीएड आणि एमए पदवी संशयित असल्याची माहिती समोर आली. नवी मुंबईतील एशिया इंटरनॅशनल नावाच्या ट्रॅव्हल एजन्सीचीही चौकशी सुरू आहे.






