• Home
  • बिजनेस
  • आता सोन्यासोबतच चांदीच्या वस्तूंवर देखील मिळणार कर्ज; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया
बिजनेस

आता सोन्यासोबतच चांदीच्या वस्तूंवर देखील मिळणार कर्ज; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया

website 12 2

Silver Loan Process : आजकाल कर्ज घेणे ही काळाची गरज बनली आहे. आतापर्यंत आपण ऐकलं असेल कि, आपण बँक वित्तीय संस्था या सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज देतात. परंतु आता सोन्याच्या दागिन्यांसोबतच आता चांदीच्या दागिन्यांवर सुद्धा कर्ज मिळू शकणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्यासोबतच चांदीचे भाव देखील गगनाला भिडले होते. त्यानुषंगाने आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ने चांदीच्या दागिन्यांवर, भांड्यांवर आणि नाण्यांवर देखील कर्ज मिळणार असल्याचे ठरवले आहे.

ही सिल्वर लोन म्हणजेच चांदीवर कर्ज घेण्याची संकल्पना दिवसेंदिवस लोकप्रिय होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यासंदर्भात RBI ने नवीन मार्गदर्शन सूचना जारी केल्या असून 2025 अंतर्गत हे नियम लावण्यात आले आहे. त्यानुषंगाने सोने चांदी गहाण ठेवण्यासंबंधित सर्व नियमांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुषंगाने हे सर्व नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होती. जाणून घेऊया काय आहे ही नवीन योजना आणि नियम.

RBI ने दिलेल्या माहितीनुसार, चांदीवर कर्ज देण्याच्या नियमात केवळ दागिने किंवा नाण्यांवर कर्ज दिले जाऊ शकते. परंतु गोल्ड ईटीएफ किंवा म्युच्युअल फंड युनिट्सवर कर्ज उपलब्ध करून दिले जाणार नाही. त्यामध्ये चांदीचे दागिने तुम्ही गहाण ठेवणार असाल तर तुम्हाला जास्तीत जास्त 10 किलो पर्यंत दागिने गहाण ठेवता येतील. जर तुम्ही नाणी गहाण ठेवणार असाल तर तुम्ही 500 ग्राम पर्यंत नाणी गहाण ठेऊ शकतात. यापेक्षा जास्त वजनाचे दागिने किंवा नाण्यांवर कर्ज देण्यात येणार नाही. आरबीआयने कर्जाची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 85 टक्क्यांपर्यँत कर्ज मिळू शकते. 2.5 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 80 टक्क्यांपर्यंत कर्ज तर 5 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जावर 75 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकते. म्हणजेच तुमच्याकडे 1 लाख रुपयांची चांदी असेल तर तुम्हाला 85 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.

जाणून घ्या कर्जाची प्रक्रिया

जर तुम्ही चांदीच्या दागिन्यांवर किंवा चांदीच्या नाण्यांवर कर्ज घेणार असाल तर कर्जाची प्रक्रिया करण्यात येते. त्यानुषंगाने ग्राहकांकडून चांदीचे दागिने नाणी किंवा चांदीचे भांडी जमा करून त्यांच्या शुद्धतेची चाचणी करण्यात येईल. त्यानंतर त्या वस्तूंचे मूल्यांकन करण्यात येईल. म्हणजे त्या वस्तूचे बाजारभावानुसार मूल्य ठरवण्यात येईल. त्यानंतर एकूण मूल्याच्या साधारण 60 ते 70 टक्के कर्ज देण्यात येईल. आता राहिला विषय व्याजदराचा. तर सोन्याच्या कर्जापेक्षा व्याजदर जास्त असू शकते. म्हणजेच सुमारे 12 ते 15 टक्के वार्षिक असू शकते. या कर्जाची परतफेड 6 महिने ते 2 वर्षापर्यँत असेल. त्यानंतर कर्ज फेडल्यानंतर तारण स्वरूपात चांदी सुरक्षितरित्या ग्राहकांना परत देण्यात येईल.

या पद्धतीने घ्या कर्ज

तुम्हाला चांदीवर कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही स्वतः तिथे उपस्थित पाहिजे. त्यानंतर तुम्ही सोबत आणलेल्या चांदीच्या गागीन्यांची किंवा नाण्यांची तपासणी केली जाईल. त्यानंतर बँक मूल्यांकन करून त्याचा मूल्यांकन अहवाल देण्यात येईल. त्यानंतर संपूर्ण शुल्क, लिलाव प्रक्रिया आणि परताव्याची अंतिम मुदत कर्ज करारांमध्ये स्पष्टपणे लिहिण्यात येईल. त्यानंतर गहाण ठेवण्यासाठी दिलेले सर्व चांदी सुरक्षितरित्या तिजोरीमध्ये ठेवण्यात येईल. आणि हे सर्व अधिकृत कर्मचारी हाताळू शकतील. आणि दरवेळी ऑडिट आणि तपासणी करण्यात येईल.

एवढ्या दिवसात परत मिळेल दागिने (Silver Loan Process)

RBI ने दिलेल्या नियमांनुसार कर्जाची परतफेड केल्यानंतर किंवा सेटलमेंट केल्यानंतर पुढील 7 कामकाजाच्या दिवसात बँके तारण ठेवण्य्त आलेले चांदी बँकेला परत करण्यात येईल. पण बँकेच्या चुकीमुळे विलंब झाल्याचे निदर्शनास आल्यास ग्राहकांना 5000 रुपये दराने नुकसान भरपाई देऊन परतफेड करावी लागेल.

कर्जाची परतफेड केल्यास भोगावे लागेल नुकसान

तुम्ही सोने किंवा चांदीचे दागिने किंवा नाणी गहाण ठेवल्यानंतर कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास बँक या दागिन्यांचा लिलाव करू शकते. त्यापूर्वी बँक सर्वप्रथम ग्राहकाला लिलावाची नोटीस देईल. जर ग्राहक संपर्कात नसतील तर सार्वजनिक सूचना देण्यात येईल. आणि एक महिन्याचा कालावधी कर्जदाराला देण्यात येईल. याशिवाय लिलावासाठी राखीव ठेवण्यात आलेली किंमत सध्याच्या किमतीच्या 90 टक्क्यांपेक्षा कमी असणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts