• Home
  • राजकारण
  • स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी ठाकरे कुटुंबांनी केले अभिवादन; आजारपणातही संजय राऊत देखील अभिवादन करण्यास उपस्थित
Top News

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी ठाकरे कुटुंबांनी केले अभिवादन; आजारपणातही संजय राऊत देखील अभिवादन करण्यास उपस्थित

website 17 1

Balasaheb Thackeray death anniversary : आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा 13 वा स्मृतिदिन आहे. या स्मृतीदिनानिमित्त शिवसैनिकांनी त्यांच्या स्मृतिस्थळावर हजेरी लावली आहे. बाळासाहेबांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांनी सकाळी 7 वाजल्यापासून दादर येथिल बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी गर्दी केली आहे. याशिवाय आजारपणानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आजारपणानंतर पहिल्यांदा दिसले.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख, उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्यासह ठाकरे कुटुंब आणि शिवसैनिक अभिवादन करण्यासाठी दादर येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळी जमले होते. त्यावेळी सर्वांनी बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली अर्पण केली. त्यानंतर ठाकरे कुटुंबाने याठिकाणी थोडावेळ थांबत अराम फर्मावला.

11 वर्षांनी एकत्र आदरांजली

गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे अनेक समारंभात एकत्र दिसत आहे. दिवाळी, भाऊबीज यासारख्या कार्यक्रमात देखील त्यांना एकत्र पाहण्यात आले. परंतु स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना 11 वर्षांनंतर एकत्र पाहण्यात आले. त्यांनी एकत्र मिळून बाळासाहेबांना अभिवादन करत आदरांजली वाहिली. त्यानंतर दोघांमध्ये चर्चच रंगल्याचे देखील चित्र दिसले.

संजय राऊतांची देखील उपस्थिती (Balasaheb Thackeray death anniversary)

खासदार संजय राऊत यांनी प्रकृतीच्या कारणास्तव 31 ऑक्टोबरपासून घराबाहेर पडणे पूर्णपणे बंद केले होते. त्यानंतर ते आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 13 व्या स्मृतीदिनानिमित्त ठाकरे कुटुंबासोबत दिसले. त्यांना स्मृतिदिनानिमित्त राहवले नाही अन ते बाळासाहेबांच्या स्मारकाचे दर्शन घ्यायला घराबाहेर पडले अशा चर्चा देखील रंगल्या. यावेळी संजय राऊत यांच्या तोंडाला संसर्ग टाळण्यासाठी मास्क लावलेला दिसला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts