Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • घराणेशाही जिंदाबाद! कोणाची बायको, कोणाचा मुलगा, तर कोणाची सून निवडणूकीच्या रिंगणात, कार्यकर्ते वाऱ्यावर..
Top News

घराणेशाही जिंदाबाद! कोणाची बायको, कोणाचा मुलगा, तर कोणाची सून निवडणूकीच्या रिंगणात, कार्यकर्ते वाऱ्यावर..

Local body elections

घराणेशाहीचा विषय राजकारणात नेहमीच चर्चेत असतो. त्याचं कारणही तसंच आहे. कार्यकर्त्यांच्या जीवावरच नेत्यांचं राजकारण सुरू असतं. सोशल मीडियावर विरोधकांच्या विरोधात पोस्ट करणं असो की रस्त्यावर उतरून प्रचार करणं असो किंवा अंगावर केसेस घेणं असो यासाठी कार्यकर्ते पुढे असतात. याचसाठी नेत्यांना कार्यकर्ते हवे असतात. मात्र हेच कार्यकर्ते नगराध्यक्ष व्हावे, किंवा स्थानिक पातळीवर एखादं पद मिळावं असं नेत्यांना बिलकूल वाटत नसल्याचं दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत कोणाची बायको, कोणाचा तर कोणाची सून नगराध्यक्षपदासाठी निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. तर स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते वाऱ्यावर सोडल्याचं बोललं जात आहेत. राज्याची एकूण परिस्थिती पाहाता घराणेशाही जिंदाबाद म्हणण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा – राजकीय घडामोडींना वेग! काल मंत्र्यांचा बैठकीवर बहिष्कार, आज शिंदे अचानक शहांच्या भेटीला

एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी

अनेक जिल्ह्यात मंत्र्याच्या आणि नेत्यांच्या कुटुंबातील सदस्याला आणि नातेवाइकांना उमेदवारी दिल्याचे चित्र आहे. नांदेड जिल्हातील लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिल्याचे समोर आलं आहे. लोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर, नगरसेवकपदासाठी गजानन सूर्यवंशी यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी, मेव्हणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रिना अमोल व्यवहारे या सर्वांना उमेदवारी दिली आहे. पक्षात घराणेशाही चालत नाही म्हणणाऱ्या भाजपने एकाच घरातील सहा जणांना तिकीट दिल्याने जिल्ह्यासह राज्यात ही नगरपरिषद चर्चेचा विषय बनली आहे.

कोणाची बायको, कोणाचा मुलगा, तर कोणाची सून निवडणूकीच्या रिंगणात 

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची पत्नी साधना महाजन यांना जामनेरमधून उमेदवारी

खामगाव नगराध्यक्षपदासाठी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी अपर्णा फुंडकर यांना तिकीट.

पुसद नगराध्यक्षपदासाठी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची पत्नी मोहिनी नाईक मैदानात.

राज्यमंत्री संजय सावकारे यांची पत्नी रजनी सावकारे यांना भुसावळ नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची उमेदवारी दिली आहे.

पाचोरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमदार किशोर पाटील यांची पत्नी सुनीता पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे.

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची पत्नी पूजा गायकवाड यांना बुलडाणा नगरपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे.

मुक्ताईनगरचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांची मुलगी संजना पाटील यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली आहे.

अनगर नगरपंचायतीसाठी भाजपचे नेते राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती, विरोधी उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. राजन पाटलांच्या सूनेचा एकतर्फी विजय झाला आहे.

चाळीसगाव नगरपरिषदेसाठी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांची पत्नी प्रतिभा चव्हाण मैदानात.

संगमनेर नगरपरिषदेसाठी आमदार सत्यजित तांबे यांची पत्नी मैथिली तांबेंना उमेदवारी मिळाली आहे.

फलटण नगरपरिषदेसाठी माजी खासदार रणजीत सिंह निंबाळकर आणि त्यांचे भाऊ समशेर सिंह निंबाळकर मैदानात आहेत.


img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts