Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • चेहऱ्यावरील काळे डाग हटवण्यासाठी ओट्स मिल फेसपॅक फायदेशीर; जाणून घ्या फायदे
लाईफस्टाईल

चेहऱ्यावरील काळे डाग हटवण्यासाठी ओट्स मिल फेसपॅक फायदेशीर; जाणून घ्या फायदे

Woman touching her smooth face with a bowl of oats and honey beside her

Oats milk face pack benefits : आजकाल आपण चेहऱ्याची योग्य प्रमाणात काळजी न घेतल्याने चेहऱ्यावर दाग पडल्याचे दिसतात. आजकालच्या धावपळीच्या जगात स्वतच्या चेहऱ्याकडे लक्ष दिले जात नाही. किंवा स्वतची काळजी देखील आपण आवश्यक तेवढ्या प्रमाणात घेत नाही. परिणामी अस्वस्थ जीवनशैली आणि प्रदूषणाने आपल्या चेहऱ्यावर खूप डाग पडतात. एवढेच नाही तर चेहऱ्यावर पडणाऱ्या डागांचे विविध करणे देखील असू शकतात. जसे की, मुरूम, हार्मोनल बदल, त्वचेच्या दाहकोत्तर डाग. या डागांपासून मुक्तता मिळवण्यासाठी मार्केट मध्ये अनेक फेसवॉश, टोनर, फेस मास्क उपलब्ध आहे. परंतु तुम्हाला घरगुती उपाय करून हे डाग घालवायचे असतील तर जाणून घ्या घरगुती उपाय ज्यामुळे डाग होतील कमी.

ओट्स मिल फेस पॅक

चेहऱ्यावरील काळे दाग हटवण्यासाठी तुम्ही ओट्स मिल फेस पॅकचा वापर करू शकतात. एवढेच नाही तर आपण आपल्या त्वचेनुसार अनेक प्रकारचे ओट्स मील फेस पॅक बनवू शकतो. जेणेकरून चेहऱ्यावरील डागच दूर होण्यास मदत होणार नाही तर त्वचा चमकदार होण्यासही फायदा होईल. तथापि, ओट्स त्वचेला मॉइश्चराइझ करतात, एक्सफोलिएट करतात, कोरडी आणि खाज सुटणारी त्वचा शांत करतात आणि डाग कमी करतात. ओट्समध्ये असलेले बीटा-ग्लूकन त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते.

ओट्स दही फेसपॅक

तुम्ही ओट्स आणि मधाचा फेस पॅक बनवू शकतात. हा पॅक त्वचेला मॉइश्चराइझ आणि चमकदार बनवतो. हा फेसपॅक तयार करण्यासाठी 2 चमचे मध, पाणी किंवा दूध घ्या. आणि हे सर्व एका भांड्यात ओट्स घेऊन त्यात एकत्र करा. आणि हे मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्या. त्याची एक घट्ट अशी पेस्ट बनेल. ही पेस्ट आपल्या चेहऱ्याला लावा आणि 15 ते 20 मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा फेसपॅक सर्व प्रकारच्या त्वचेसाठी वापरता येऊ शकतो.ओट्स आणि दही फेसपॅक

हे ही वाचा : हिवाळ्यात केसांसाठी उपयुक्त ठरेल मोहरीचे तेल; यात मिक्स करा ही गोष्ट, होईल डबल फायदा

हा फेसपॅक तेलकट आणि मुरूम असलेल्या चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे. कारण दही मध्ये असलेले लॅक्टिक ऍसिड असते. यामुळे त्वचा स्वच्छ होण्यास फायदा होतो. आणि मुरुम देखील कमी होऊ शकतात. हे फेसपॅक तयार करण्यासाठी तुम्हाला ओट्स आणि दही एकत्र करावे लागेल. तसेच या मिश्रणात तुम्ही गुलाब जल देखील वापरू शकतात. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्याला लाऊन 15 ते 20 मिनिट ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या.

ओट्स च्या फेसपॅकचे फायदे

आपल्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी आपण घरगुती उपाय करण्यास प्राधान्य देतो. कारण यामुळे सईड इफेक्टस जाणवत नाही. ओट्स आणि मध हे चेहऱ्यासाठी सौम्य आणि शांत आणि पोषक असल्यामुळे त्याचे प्रचंद फायदे जाणवतात. या फेसपॅक मुळे त्वचेतील मळ निघतो, ओट्समध्ये सौम्य एक्सफोलिएटिंग गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेवरील मृत पेशी, मळ आणि तेलाचा थर अलगद निघून जातो. तसेच त्वचा स्वच्छ, मऊ आणि तजेलदार दिसू लागते. या फेसपॅक मध्ये वापरण्यात आलेल्या मधामुळे चेहऱ्यावर पिंपल्स न येण्यास कार्य करतो. तसेच मध त्वचेची ओलावा राखण्यास मदत करतो.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

हळदाची पाने : आयुर्वेदिक गुणांचा अनमोल खजिना हल्लीम (Garden Cress Seeds): आरोग्यासाठी नैसर्गिक सुपरफूड स्नायूंची ताकद वाढवायची? रोज खा हे ७ प्रोटीन सुपरफूड्स! स्ट्रॉबेरी: गोड लाल आरोग्यदायी फळ सुंठ (Dry Ginger): आरोग्याचा खजिना