अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज (२५ नोव्हेंबर २०२५) अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या इतिहासात एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण नोंदवला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते राम मंदिराच्या शिखरावर भगवा धर्म ध्वज फडकावण्यात आला. यानंतर नरेंद्र मोदींनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांना संबोधित केले. त्यांनी हा धर्मध्वज केवळ एक ध्वज नसून भारतीय संस्कृती आणि रामराज्याच्या मूल्यांचे प्रतीक असल्याचे स्पष्ट केले.
“हा धर्मध्वज केवळ एक ध्वज नाही तर, भारतीय संस्कृतीचा ध्वज आहे. भगवा रंग, सूर्यवंशाचे चिन्ह, ‘ओम‘ शब्द आणि कोविदार वृक्ष हे सर्व रामराज्याच्या वैभवाचे प्रतिरूप आहेत. हा ध्वज एक संकल्प आहे, एक यश आहे, संघर्षाची कथा आहे. येणाऱ्या हजारो शतकांपर्यंत, हा ध्वज भगवान रामाच्या मूल्यांचा प्रचार करेल. हा ध्वज संतांची साधना आणि समाजाची प्रेरणा आहे. सत्य हेच धर्म आहे,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
हेही वाचा – अयोध्येत धर्म ध्वजारोहण सोहळा, ‘असा’ असणार पंतप्रधान मोंदींचा अयोध्येतील नियोजित कार्यक्रम
श्री अयोध्या धाम में आज श्री राम जन्मभूमि मंदिर के शिखर पर ध्वजारोहण सनातन धर्म के शाश्वत तेज से समूची वसुंधरा को आलोकित कर रहा है।
राष्ट्रीय गौरव, सांस्कृतिक धरोहर और मानवता के सर्वोत्तम मूल्यों का उद्घोष, यह लहराता भव्य भगवा ध्वज विश्व की हर उस आस्था और अस्मिता के लिए आशा का… pic.twitter.com/4QXJ2RqD9m
— Yogi Adityanath (@myogiadityanath) November 25, 2025
“हा ध्वज सांगेल की, प्राण जाये पर वचन न जाए.. ” – पंतप्रधान मोदी
“हा ध्वज सांगेल की, प्राण जाये पर वचन न जाए, जे सांगितले जाईल तेच करावे, कर्म आणि कर्तव्याला प्राधान्य द्यावे, हेच या ध्वजाची मुख्य शिकवण असेल. हा धर्मध्वज वैर मिटवायला सांगेल आणि सर्वांचे सुख पाहायला सांगेल. हा ध्वज भेदभाव आणि पीडेतून मुक्ती देण्यास सांगेल. कोणी दुखी राहू नये, कोणी दरिद्री राहू नये, गरीबी राहू नये असा समाज बनवा,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
ध्वज पताक तोरन पुर छावा। कहि न जाइ जेहि भाँति बनावा॥
सुमनबृष्टि अकास तें होई। ब्रह्मानंद मगन सब लोई॥सियावर रामचन्द्र की जय। pic.twitter.com/XwPZOhTZsp
— Yogi Adityanath (@myogiadityanath) November 25, 2025
‘असा’ आहे ध्वज
भगव्या रंगाचा २२ फूट लांब व ११ फूट रुंद असा ध्वज आता मंदिराच्या १६१ फूट उंच शिखरावर फडकताना दिसतोय. या ध्वजाचा ध्वजदंड ४२ फूट इतका उंच आहे. या ध्वजावर तीन चिन्ह आहेत. यामध्ये सूर्य, ऊँ आणि कोविदार वृक्षाचा समावेश आहे. सनातन परंपरांमध्ये भगवा रंग हा त्याग, बलिदान, वीरता व भक्तीचं प्रतीक मानला जातो.
अयोध्या के पावन धाम में श्री राम जन्मभूमि मंदिर में ध्वजारोहण समारोह का हिस्सा बनना मेरे लिए अत्यंत भावविभोर करने वाला अनुभव रहा। शुभ मुहूर्त में संपन्न हुआ यह अनुष्ठान हमारे सांस्कृतिक गौरव और राष्ट्रीय एकता के नए अध्याय का उद्घोष है। राम मंदिर का गौरवशाली ध्वज, विकसित भारत के… pic.twitter.com/1uwYN2NXHW
— Narendra Modi (@narendramodi) November 25, 2025
कोविदार वृक्षाचं महत्त्व
ध्वजावरील कोविदार वृक्षाचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. पौराणिक मान्यतांनुसार हा पारिजात व मंदार या वृक्षांच्या दिव्य संयोगातून बनलेला दिव्य वृक्ष आहे. आजच्या काळातील कचनार वृक्ष हा कोविदार वृक्षासारखा दिसतो. सूर्यवंशी राजांच्या ध्वजावर या वृक्षाची प्रतिमा असायची. महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेल्या रामायणानुसार भरत राजाच्या ध्वजावर कोविदार वृक्षाची प्रतिमा होती.
ध्वज हा विकसित भारताच्या पुनर्जागरणाचा पाया आहे – योगी अदित्यनाथ
अयोध्येच्या पवित्र तीर्थक्षेत्रातील श्री रामजन्मभूमी मंदिरात ध्वजारोहण समारंभाचा भाग असणे हा माझ्यासाठी एक अतिशय भावनिक अनुभव होता. शुभ मुहूर्तावर पार पडलेला हा विधी आपल्या सांस्कृतिक अभिमान आणि राष्ट्रीय एकात्मतेतील एका नवीन अध्यायाचा शुभारंभ करतो. राम मंदिराचा गौरवशाली ध्वज हा विकसित भारताच्या पुनर्जागरणाचा पाया आहे. हा ध्वज धोरण आणि न्यायाचे प्रतीक बनो, सुशासनाद्वारे समृद्धीचा मार्गदर्शक बनो आणि विकसित भारताची ऊर्जा म्हणून हा ध्वज सदैव फडकत राहो.











