WPL 2026 Auction : महिला प्रीमियर लीग 2026 चा लिलाव आज राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली इथं होणार आहे. या लिलावासाठी भारत आणि परदेशातील 277 महिला खेळाडूंनी नोंदणी केली आहे, परंतु पाचही संघांमध्ये फक्त 73 खेळाडू भरले जातील. नवीन हंगामापूर्वी, अनेक संघांनी त्यांच्या काही प्रमुख खेळाडूंना रिलीज करुन चाहत्यांना आश्चर्यचकित केलं. त्यामुळं, लिलावाच्या टेबलावरील बोली लावण्यासाठी जोरदार स्पर्धा होईल. पण त्यापूर्वी, या लिलावात कोणत्या संघाकडे सर्वात जास्त पैसे आहेत आणि कोणत्या खेळाडूंना सर्वाधिक मागणी आहे ते जाणून घेऊया.
प्रत्येक संघाकडे किती पर्स शिल्लक? :
महिला प्रीमियर लीग 2026 च्या लिलावात सर्वात जास्त पैसे असणारा संघ यूपी वॉरियर्स असेल. यूपीच्या पर्समध्ये 14.5 कोटी रुपये आहेत. गुजरात जायंट्सकडेही 9 कोटी रुपये आहेत. स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडे 6.15 कोटी आहेत, तर गतविजेता मुंबई इंडियन्स 5.75 कोटीच्या पर्ससह लिलावात सहभागी होईल.
𝐀𝐛𝐨𝐮𝐭 𝐓𝐢𝐦𝐞 ⏳
The #TATAWPL Mega Auction is finally here! 😍
Your prediction for the most expensive player? 🤔✍️
Watch #TATAWPLAuction 2026 LIVE today on @JioHotstar & @StarSportsIndia 📺 📱 pic.twitter.com/DmjfSjxcGg
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) November 27, 2025
प्रत्येक संघाला किती खेळाडू घ्यायचे आहेत? :
2026 च्या महिला प्रीमियर लीगसाठी यूपी वॉरियर्सला सर्वाधिक जागा भरायच्या आहेत. यूपी संघ किमान पाच परदेशी खेळाडूंसह एकूण 17 खेळाडूंवर बोली लावेल. गुजरात जायंट्सकडे पाच परदेशी खेळाडूंसह 16 जागा आहेत. आरसीबीकडे 14 जागा शिल्लक आहेत. त्यांना किमान चार परदेशी खेळाडूंची आवश्यकता आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबईकडे प्रत्येकी 13 जागा आहेत, ज्यामध्ये परदेशी खेळाडूंसाठी चार जागा आहेत.
हे ही वाचा : गुवाहाटी कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव; 408 धावांनी आफ्रिकेनं टीम इंडियाला हरवत जिंकली मालिका
मार्की खेळाडूंवर होणार पैशांचा वर्षाव :
महिला प्रीमियर लीग 2026 मध्ये अनेक मार्की खेळाडू आहेत ज्यांवर पैशांचा वर्षाव होऊ शकतो. यामध्ये भारताच्या दीप्ती शर्मा आणि रेणुका सिंग, न्यूझीलंडच्या सोफी डेव्हिन आणि अमेलिया केर, इंग्लंडची एक्लेस्टोन, ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हीली आणि मेग लॅनिंग आणि दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्ड यांचा समावेश आहे. क्रांती गौड, श्री चरणी आणि फोबी लिचफिल्ड, हरलीन देओल आणि अष्टपैलू स्नेह राणा यांच्यावरही सर्व संघांची नजर असेल.












