• Home
  • महाराष्ट्र
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; पुण्यातील मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामकाजास केंद्र सरकारची मंजूरी
Pune

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; पुण्यातील मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामकाजास केंद्र सरकारची मंजूरी

Pune Metro Phase 2 route map with metro train graphic showing the approved expansion plan

Pune Metro Phase 2 Approval : विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीचे जाळे अधिक विस्तारीत करण्यात येणार आहे. याबाबत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. ही पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यानुषंगाने आता पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे कामकाजास मंजूरी दिली आहे. या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे पुणे शहराचे मेट्रो नेटवर्क 100 किलोमीटरच्या पुढे वाढण्याची शक्यता आहे. जेणेकरुन पुणेकरांचा प्रवास अधिक जलद आणि आरामदायी होण्यास फायदा होईल. एवढेच नाही तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्याशहरातील वाढत्या लोकसंख्येसाठी हा प्रकल्प विकासाची नवी दिशा ठरेल अशी आशा आहे.

या मार्गिका जोडल्या जाणार

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये दोन महत्वपूर्ण मार्गिकांना मंजूरी देण्यात आली हे. त्यामध्ये मार्गिका 4 (line 4) हा मार्ग खराडी -हडपसर – स्वारगेट – खडकवासला असा असणार आहे. तर मार्गिका 4 a ही नळस्टॉप –वॉरजे –माणिक बाग या मार्गाना जोडेल. या दोन्ही मार्गांची एकूण लांबी 31.636 किमी एवढी असून एकूण 28 एलिव्हेटेड स्टेशन विकसित करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाच्या कामकाजासाठी अंदाजित खर्च तब्बल 9,857.85 कोटी रुपये असेल. हा संपूर्ण खर्च केंद्र सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार आणि बाह्य निधी संस्था यांच्या संयुक्त योगदानातून उभारण्यात येईल. तर या प्रकल्पाचा कालावधी 5 वर्षांचा निश्चित करण्यात आला आहे.

 

पुणे शहरातील मल्टिमोडल नेटवर्क अधिक सुलभ

मंजूर करण्यात आलेल्या पुणे मेट्रोचा दूसरा टप्पा शहरातील मुख्य भागांना जोडणार आहे. हा प्रकल्प पुणे महानगरपालिकेच्या CMP म्हणजे Comprehensive Mobility Plan चा महत्वपूर्ण भाग आहे. मेट्रोचा दूसरा टप्पा हा खराडी येथील मोठे ITहब, हडपसर औद्योगिक पट्टा, स्वारगेट जंक्शन या मुख्य भागाना जोडणार आहे. यामुळे पुणे यामुळे पुणे शहरातील मल्टिमोडल नेटवर्क अधिक सुलभ होईल. एवढेच नाही तर भविष्यात मेट्रो लाइनचा आणखी विस्तार होण्याची शक्यता आहे.

वाहतूक कोंडी थांबणार

पुण्यात सतत होणारी वाहतूक कोंडी या मेट्रो मार्गिकेमुळे कमी होण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या मेट्रोचा दुसऱ्या टप्प्यामुळे मोठा दिलासा मिळेल. एवढेच नाही तर पुण्यातील सोलापूर रोड, मगरीपट्टा रोड, सिंहगड रोड, कर्वे रोड आणि मुंबई-बेंगळुरू हायवे यांसारख्या वाहतूक कोंडी होणाऱ्या मार्गावरील कोंडी कमी होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : मतदारांची पार लायकीच काढली! “मटण खा त्यांचं, पण बटण दाबा आमचं”; मंत्र्याचं खळबळजनक विधान

पुणे शहराला मेट्रोच्या विस्तारामुळे वेगवान सुरक्षित आणि eco friendly प्रवास मिळण्याची शक्यता आहे. जेणेकरून शहरातील वायू प्रदूषण कमी होण्यास मदत करेल. आणि नागरिकांच्या वेळेची बचत होईल आणि आरामदायक प्रवास करण्यास प्राधान्य मिळेल. येणाऱ्या काळात पुणे मेट्रोच्या प्रवाशी संख्येत मोठी वाढ होणार आहे. सन 2028 पर्यंत दररोज सुमारे 4.09 लाख प्रवासी प्रवास करण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर 2038 मध्ये ही संख्या 7 लाख पर्यंत पोहोचु शकते. 2058 पर्यंत 11.7 लाखांपेक्षा अधिक प्रवासी हे मार्ग वापरतील अशी आशा आहे. हे अंदाज येत्या दशकांमध्ये
मार्गिका क्र. 4 आणि मार्गिका क्र.4ए चा वापर करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत होणारी लक्षणीय वाढ अधोरेखित करताना दिसते.

 

शहरी वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या दिशेने वाटचाल

हा प्रकल्प महाराष्ट्र मेट्रो रेल महामंडळ यांच्या वतीने राबवण्यात येणार असून महामंडळ बांधकाम, वीज पुरवठा यांत्रिक बाबी आणि प्रणालींशी संबंधित सर्व प्रकारचे काम करून घेणार आहे. या कामकाजाच्या मंजुरीमुळे पुण्यातील मेट्रोच्या जाळ्याचा विस्तार 100 किमीचा टप्पा पार करणार असून ही आधुनिक एकात्मिक तसेच शाश्वत शहरी वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या दिशेने शहराच्या वाटचालीतील महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts