Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • या पदार्थांचे सेवन केल्यास, १०० टक्के रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येणार
Top News

या पदार्थांचे सेवन केल्यास, १०० टक्के रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येणार

foods to control blood pressure : उच्च रक्तदाबामुळे अनेक आजार होतात. त्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोक देखील होऊ शकतो. हिवाळ्यात खाण्याच्या पद्धती बदलतात, ज्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो. यामुळे ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे. त्यांनी थंडीच्या दिवसात रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी कोणते निरोगी पदार्थ खावेत हे तुम्हाला माहित असले पाहिजे. तर आजच्या लेखात तज्ञांनी सांगितले आहे की हिवाळा असो वा उन्हाळा, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. हे साध्य करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. हिवाळ्यात, तुम्ही निश्चितपणे या पदार्थांचे सेवन केल्याने तुमचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात.

आहार तज्ञांच्या मते, हिवाळ्याच्या दिवसात पालक भाजीचे सेवन करावे. कारण उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी पालक खूप फायदेशीर आहे. यावर संशोधन देखील करण्यात आले आहे. पालक ही एक हिरवी पालेभाजी आहे ज्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण चांगले असते, एक वनस्पती-आधारित संयुग जे उच्च रक्तदाब कमी करू शकते. तसेच पालक मध्ये अँटीऑक्सिडंट्स, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम देखील असतात, ज्यामुळ तुमचे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास फायदेशीर ठरतात.

हे ही वाचा : सापापेक्षा विषारी आहे ‘हा’ मासा, स्पर्श करताच होतो माणसाचा मृत्यू

सुका मेवा

तुम्हाला जर उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर थंडीच्या या दिवसांमध्ये सुक्यामेव्याचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. रक्तदाब कमी करण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या संतुलित आहाराचा भाग म्हणून सुक्या मेवा आणि भोपळ्याच्या बिया, अळशी, चिया बियाणे, पिस्ता, अक्रोड, बदाम, या सर्व गोष्टींचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी आणि उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

गाजराचे सेवन

थंडीच्या या हंगामात अनेक लोकांच्या आहारात गोड आणि पौष्टिक गाजरांचा समावेश हा असतोच, कारण तुम्ही जर नियमित गाजरांचे सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रित करतात. 2023 च्या एका अभ्यासात असे आढळून आले की दररोज सुमारे 100 ग्रॅम गाजर खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका 10% कमी होतो.

अंडीचे सेवन उच्च रक्तदाबा ठेवते नियंत्रित

अंडी केवळ पोषक तत्वांनी समृद्ध नसतात, तर संशोधनातून असेही दिसून आले आहे की ते उच्च रक्तदाब नियंत्रित करण्याचा एक चांगला मार्ग आहेत. तुम्ही आठवड्यातून पाच किंवा त्याहून अधिक अंडी खाल्ल्याने उच्च रक्तदाबाची पातळी 2.5 मिमी एचजीने कमी होते. त्यामुळे अंडी खाणाऱ्यांमध्ये दीर्घकालीन उच्च रक्तदाब होण्याची शक्यता देखील लक्षणीयरीत्या कमी होती.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

हळदाची पाने : आयुर्वेदिक गुणांचा अनमोल खजिना हल्लीम (Garden Cress Seeds): आरोग्यासाठी नैसर्गिक सुपरफूड स्ट्रॉबेरी: गोड लाल आरोग्यदायी फळ सुंठ (Dry Ginger): आरोग्याचा खजिना साजूक तूप: आरोग्याचं अमृत, रोजच्या आहारातली सुवर्णकिल्ली!