Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • उद्या पुण्यातील शाळांना सुट्टी; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Pune

उद्या पुण्यातील शाळांना सुट्टी; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

School holiday election orders : उद्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्यानुषंगाने पुण्यातील जिल्हाधिकारी यांनी शाळांना सुट्ट्या जाहीर करण्याचा आदेश पारित केला असून उद्या म्हणजे 2 डिसेंबर रोजी शाळांना सुट्टी राहणार आहे.

महाराष्ट्र राज्यात एकाच दिवशी विविध जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवरथा बाहेर गावी मतदा असणाऱ्या मतदारांच्या सोयीसाठी पुण्याच्या जिल्हाधिकारी यांनी 2 डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर केली आहे. त्या संदर्भातील आदेश काही दिवसांपूर्वी पारित करण्यात आले होते. त्यानुसार आता उद्या शाळांना आणि कार्यालयांना देखील सुट्टी राहणार आहे.

हे ही वाचा : ऐन निवडणुकांच्या तोंडावर या जिल्ह्यातील निवडणूक कार्यक्रम लांबणीवर; या दिवशी होणार निवडणूक

कोणाला राहणार सुट्टी

राज्यात एकाच दिवशी मतदान असल्याने सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. निवडणुकांच्या दिवशी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी सुट्टी नियमांनुसार पगारी (paid) सुट्टी देण्यात येणार असल्याच्या संदर्भातील आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी पारित केले आहे. तसेच दुसऱ्या जिल्ह्यातीळ मतदार संघातील कर्मचाऱ्यांना देखील सुट्टी असणार आहे.

पुणे जिल्ह्यातील आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी-उरळी देवाची, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, लोणावळा, माळेगाव बुद्रुक, मंचर, राजगुरुनगर, सासवड, शिरूर, तळेगाव दाभाडे आणि वडगाव या नगरपरिषद व नगरपचांयतीच्या मतदारसंघामध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts