Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी इंडियन शब्दावर घातली बंदी; केले हे वादग्रस्त वक्तव्य
वर्ल्ड

डोनाल्ड ट्रम्प यांनी इंडियन शब्दावर घातली बंदी; केले हे वादग्रस्त वक्तव्य

Donald Trump controversial statement on Indian word : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या निर्णयामुळे चर्चेत असतात. ते पुन्हा एकदा आता त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आले आहे. त्यांनी आता इंडियन शब्दाबद्दल अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध तणावात सापडले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लगावला होता. एवढेच नाही तर भारताबद्दल बऱ्याचदा धक्कादायक विधान करण्यात आली होती. एवढेच नाही तर भारताला अडचणीत आणण्यासाठी H-1B व्हिसाच्या नियमात देखील बदल करण्यात आले होते. भारतातून अमेरिकेत H-1B व्हिसा वर जाऊन अनेक भारतीय व्यक्ती काम करतात. या व्हिसावर आतापर्यंत 88 लाख रुपये शुल्क आकारण्यात येते. या व्हिसाच्या नियमात त्यांनी बदल केला आहे.

हे ही वाचा : इंडोनेशियात पूर आणि भूस्खलनामुळं कहर; आतापर्यंत 400 लोकांचा मृत्यू, अनेक गावं नकाशावरुन गायब

आता परत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल मोठे विधान केले आहे. अमेरिकेत आता इंडियन हा शब्द वापरला जाऊ नये, असे विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाने सर्वत्र खळबळ उडाली आहे. अमेरिकेमध्ये अनेक वर्षांपासून काही या शब्दावरून मोठा वाद सुरु आहे. आता पुन्हा हा वाद वाढण्याची शक्यता आहे. त्यांचे हे वादग्रस्त वक्तव्य भारता राहणाऱ्या लोकांसाठी नसून अमेरिकेतील लोकांसाठी आहे.

बऱ्याच अमेरिकन संघटनांनी इंडियन हा शब्द जुना आणि असंवेदनशील असल्याचे म्हंटले आहे.  इंडियन हा शब्द फक्त भारतातील भारतीयांसाठी राखीव असावा परंतु तो शब्द मूळ आदिवासींसाठी वापरला जाऊ नये असे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी देखील ट्रम्प यांनी आदिवासी यांच्यावर केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली होती. आणि त्यामुळे ते अडचणीत देखील सापडले होते.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts