PM Office renamed as ‘Seva Teerth : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री कार्यालयाचे नाव बदलण्यात आलं असून त्याला सेवा तीर्थ हे नवीन नाव देण्यात आलं आहे. मात्र, हे नाव देण्यात आलं आले त्याचा उद्देश नेमका आहे?. ‘सेवातीर्थ’ हे नाव ‘सेवा’ या भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. येथे राष्ट्रीय प्राधान्यक्रम निश्चित केले जातील. हा बदल भारताच्या सार्वजनिक संस्थांमध्ये एक शांत पण खोलवर परिणाम करणारा बदल घडवत असल्याचं म्हटलं आहे.
‘सेवातीर्थ’ हे नाव पंतप्रधान कार्यालयाच्या कार्यशैली आणि जनसेवेप्रती असलेल्या समर्पणाला अधोरेखित करते. हा बदल केवळ प्रशासकीय नसून तो सांस्कृतिक आहे. जो सार्वजनिक संस्थांमध्ये होत असलेल्या मोठ्या बदलाचा भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, सार्वजनिक पदांची भावना पुनर्परिभाषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हेही वाचा – “… त्यामुळे राज्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग आणलाच पाहिजेच;” काँग्रेस
या बदलामुळे सरकारी कामकाजात अधिक वेग येईल..
केंद्र सरकारने प्रधानमंत्री कार्यालयाचं नाव बदलून आता सेवातीर्थ असं करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन नावासह पंतप्रधान कार्यालय लवकरच एका नवीन कॉम्प्लेक्समध्ये स्थलांतरित होणार आहे. हे नवीन कॉम्प्लेक्स ‘एक्झिक्युटिव्ह एन्क्लेव्ह-१’ मध्ये उभारण्यात आलं आहे. या बदलामुळे सरकारी कामकाजात अधिक वेग येईल आणि भारत सरकारच्या कार्यपद्धतीत एक नवीन अध्याय सुरू होणार असल्याचं देखील म्हटलं आहे.
🚨Union Govt. announces renaming of some important offices-
The Central Secretariat will now be called Kartavya Bhavan
The Prime Minister’s Office has been renamed Seva Teerth
In Rajasthan, Raj Bhavan will now be known as Lok Bhavan. pic.twitter.com/xwbhbpsfcQ
— Indian Infra Report (@Indianinfoguide) December 3, 2025
सेवा, कर्तव्य आणि जबाबदारीचे केंद्रस्थान
या बदलाची सुरुवात २०१६ मध्ये झाली होती. जेव्हा पंतप्रधान मोदी यांनी आपल्या निवासस्थानाचे नाव ‘७, रेस कोर्स रोड’ वरून ‘७, लोक कल्याण मार्ग’ असं बदललं. त्यानंतर २०२२ मध्ये राजपथचं नाव बदलून ‘कर्तव्य पथ’ करण्यात आलं. सरकारच्या मते, हे बदल केवळ प्रतिमा निर्मिती नसून, शासन करण्याच्या विचारसरणीतील बदलाचं प्रतीक आहे. जुन्या सत्ता आणि नियंत्रणाच्या संकेतांना दूर करून सेवा, कर्तव्य आणि जबाबदारीला केंद्रस्थानी आणलं जात आहे.
अशी असणार नवीन ‘सेवा तीर्थ’ इमारत..
नवीन ‘सेवातीर्थ’ कॉम्प्लेक्समध्ये ३ आधुनिक इमारती आहेत. यापैकी सेवातीर्थ -१ हे पंतप्रधान कार्यालयाचं नवीन ठिकाण असलं. अनेक दशकांनंतर पंतप्रधान कार्यालय साउथ ब्लॉक सोडत आहे. सेवातीर्थी -२ या इमारतीत कॅबिनेट सचिवालय असलं, जिथे सरकारचे महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. सेवातीर्थ -३ मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) यांचे कार्यालय असेल, जे देशाच्या सुरक्षाविषयक बाबी पाहील्या जातात. या स्थलांतराची प्रक्रिया सुरू झाली आहे. १४ ऑक्टोबर रोजी कॅबिनेट सचिव टीव्ही सोमनाथन यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि तिन्ही सेनाप्रमुखांसोबत ‘सेवातीर्थ-२’ मध्ये एक महत्त्वाची बैठक घेतली. हे नवीन कॉम्प्लेक्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे, ज्यामुळे सरकारी कामकाज अधिक जलद गतीने पार पडणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.












