Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • आदित्य ठाकरे यांच्याकडे विरोधी पक्षनेते पद जाण्याची चर्चा; भास्कर जाधव यांना डावलले; या पदावर त्यांनी सोडले टीकास्त्र
Top News

आदित्य ठाकरे यांच्याकडे विरोधी पक्षनेते पद जाण्याची चर्चा; भास्कर जाधव यांना डावलले; या पदावर त्यांनी सोडले टीकास्त्र

aaditya thakare opposite leader bhaskar jadhav talk on that topic

aaditya thakare opposition leader post: आज महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. परंतु या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते या पदाकडून मोठे राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. विधानमंत्रिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गेल्या वर्षभरापासून विरोधी पक्षनेत्यांची पदे रिक्त ठेवण्यात आली होती. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधारी महायुतीवर टीका टिपण्णी करत चहापानावर बहिष्कार टाकला होता. आता विरोधी पक्षनेता कोण यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने कान टवकारले आहे.

विधानमंत्रिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेत्यांची पदे रिक्त असल्याने अनेक महिन्यापासून विरोधी पक्षनेता म्हणून अनुभवी आणि आक्रमक आमदार म्हणून भास्कर जाधव यांचे नाव चर्चेत असल्याचे निदर्शनास आले होते. परंतु आता विरोधीपक्ष नेता म्हणून आदित्य ठाकरे यानं नेमण्याची चर्चा उद्धव ठाकरे गटात सुरु आहे. उद्धव ठाकरे हेच आदित्य ठाकरे यांना हे पद मिळावे यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यासंदर्भात ते देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार असल्याचे वृत्त समोर आले होते.

“मी यावर बऱ्याचदा बोललो कि, मुख्यमंत्र्यांचे विधान मी ऐकले. उपमुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकले, मला लेखी पत्र विधीमंडळ सचिवालयाने दिले असून एकूण सदस्य संख्येच्या 10 टक्के असले पाहिजे असे खोटे सांगितले जाते. यावर आता माझे आव्हान आहे कि, मला घटनेतील तरतूद दाखवा, कायद्यातही तरतूद दाखवा. असे भास्कर जाधव यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा : लोकसभेत वंदे मातरमवर होणार 10 तास मॅरेथॉन चर्चा; स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार सुरुवात

मी आक्रमक आहे म्हणून विरोधी पक्षनेते पद मला नाही

उपसभापती यांना पक्षांतर बदलीवर कारवाईसाठी कुठलाही अधिकार नसून विधानसभा अध्यक्ष निवडीचा अधिकार आहे. सध्या खोटे बोल पण रेटून बोल असे सुरु आहे. अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. तसेच “मी आक्रमक आहे म्हणून विरोधी पक्षनेते पद मला देत नाही. कारण ते मला घाबरतात, असंच दिसत असं देखील ते म्हणाले.

ती राजकीय सोय आहे

उद्धव ठाकरे म्हणतात, उपमुख्यमंत्री हे घटनात्मक पद नसून ती राजकीय सोय आहे. हे बरोबर आहे. यापदाला कुठलेही अधिकार नसून विरोधी पक्षनेता पदाला अधिकार आहेत. आता विरोधीनेता पद खरंच आदित्य ठाकरे यांच्याकडे जाणार का ? कि दुसरा कोणी या पदावर असेल हे पाहणे योग्य ठरेल.

हे पद रिक्त असल्याचे कारण

विरोधी पक्षनेते हे पद रिक्त का आहे असा सवाल तुम्हाला पडला असेल. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी २८८ जागा असलेल्या विधानसभेत एकूण जागांच्या किमान १०% जागा (म्हणजे २९ आमदार) असणे आवश्यक आहे. परंतु महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाकडे स्वतंत्रपणे 29 आमदार नाहीत, त्यामुळे हे पद अद्याप रिक्त आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts