• Home
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्रात तापमानात होताय बदल; पुढील काही दिवस थंडी वाढण्याची शक्यता
Mumbai

महाराष्ट्रात तापमानात होताय बदल; पुढील काही दिवस थंडी वाढण्याची शक्यता

in maharashtra weather got change in few days

Maharashtra weather update  : महाराष्ट्र राज्यात थंडीचे प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत आहे. आता हवामान खात्याने महत्वाचे अपडेट शेअर केले असून लवकरच थंडीचा पारा अजून वाढणार असल्याची शक्यता आहे. सध्या धुळे नाशिक या शहरांचा तापमानाचा पारा 5-6 डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली उतरला आहे. त्यामुळे आता हवामान खात्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

राज्यामध्ये काही दिवसांपासून थंडी वाढताना दिसत आहे. दिवसभर दुपारी थोडे ऊन पडल्याने आपल्याला तापमानात बदल झाल्याचे दिसून येते. आता थंडी गारवा जाणवायला लागला असून वातावरणात बदल दिसून येत आहे. आज मी उमाबाई येथे जास्त गर्व जाणवेल आणि पुण्यात देखील थंड गारवा जाणवणार आहे. पुढील काही दिवस गारवा वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पालघर जिल्ह्यात सकाळी 16-17 सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले असून रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याठिकाणी सकाळी 17-19 डिग्री सेल्सियस तापमान आहे. आजपासून दुपारी तापमान 30–32°C राहण्याची शक्यता आहे. तर कोकणात काही दिवस हवामान स्वच्छ, आणि कोरडे राहू शकते. पूर्व विदर्भात देखील प्रचंड प्रमाणात थंडी जाणवत असून पूर्व विदर्भासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हे ही वाचा : लोकसभेत वंदे मातरमवर होणार 10 तास मॅरेथॉन चर्चा; स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार सुरुवात

द्राक्षाचे  झाले नुकसान

धुळे शहरात जिल्ह्यातील तापमानाचा पारा वाढला असून धुळ्यात 5.4 अंश सेल्सियस तापमान सध्या आहे. याचा संपूर्ण परिणाम जनजीवनावर झाल्याचे दिसत आहे. या थंडीचा मोठा फायदा गहू पिकांना होत असून स्ट्रॉबेरी, द्राक्षे या पिकांचे मोठे नुकसान होताना दिसत आहे.

स्ट्रॉबेरीवर दिसून येतोय परिणाम

नोव्हेंबर–डिसेंबर महिन्यात नेहमीप्रमाणे कडाक्याची थंडी असावी अशी अपेक्षा असते. आणि याच थंडीमुळे स्ट्रॉबेरीची वाढ जोमदार होते. परंतु गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वातावरणाने अक्षरशः पलटी मारल्याचे दिसते. ढगाळ वातावरण, हवेत दाट धुके, या तापमानातील अचानक वाढीचा परिणाम आता थेट स्ट्रॉबेरी पिकावर उमटू लागला आहे. किडीचा प्रादुर्भाव, फुलगळी, आणि फळधारणेवर परिणाम—अशा विविध समस्यांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts