Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • रशिया-युक्रेन युद्ध संपणार; राष्ट्राध्यक्ष पुतिन नंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की भारत दौऱ्यावर येणार?
Top News

रशिया-युक्रेन युद्ध संपणार; राष्ट्राध्यक्ष पुतिन नंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की भारत दौऱ्यावर येणार?

Ukrainian President Zelensky and Russian President Putin, international diplomacy, India visit speculation

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत भेटीच्या समाप्तीनंतर, आता अशी चर्चा आहे की युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की नवीन वर्षाच्या सुरुवातीला, 2026 मध्ये नवी दिल्लीला भेट देऊ शकतात. द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या भारत भेटीच्या तारखांबाबत वाटाघाटी सुरु आहेत. पुतिन यांच्यानंतर झेलेन्स्की यांचा भारत दौरा महत्त्वाचा ठरु शकतो.

झेलेन्स्की यांचा भारत दौरा अनेक घटकांवर अवलंबून :

द इंडियन एक्सप्रेसच्या मते, पुतिन यांच्या भारत भेटीपूर्वीच नवी दिल्ली आणि झेलेन्स्की यांचे कार्यालय संपर्कात होतं. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या भारत भेटीची वेळ आणि व्याप्ती अनेक घटकांवर अवलंबून असेल, ज्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची शांतता योजना कशी पुढं जाते आणि युद्धभूमीवरील घडामोडींचा समावेश आहे. युक्रेनचे देशांतर्गत राजकारण झेलेन्स्कीच्या भारत भेटीवर परिणाम करु शकते. उल्लेखनीय म्हणजे, युक्रेननं आतापर्यंत फक्त तीन वेळाच आपल्या राष्ट्रपतींना भारतात पाठवले आहे, ते म्हणजे 1992, 2002 आणि 2012 मध्ये.

हे ही वाचा : अमेरिकाच्या शेजारील देशाचा 7 रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपाचा झटका; कोणत्याही नुकसानीचं वृत्त नाही

झेलेन्स्की यांच्या कार्यालयाशी संपर्क :

वृत्तानुसार, भारतीय अधिकारी झेलेन्स्की यांचे विश्वासू आणि चीफ ऑफ स्टाफ, आंद्रेई येरमाक यांच्या संपर्कात होते, ज्यांनी अलीकडेच भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यामुळं राजीनामा दिला होता. आता ते निघून गेल्यानंतर, नवी दिल्ली झेलेन्स्की यांच्या कार्यालयातील नवीन अधिकाऱ्यांशी चर्चा पुढे नेण्यासाठी आणि परस्पर सोयीस्कर तारखा निश्चित करण्यासाठी संपर्क साधत आहे.

 

युरोपचं पुतिन यांच्या भेटीवर बारकाईनं लक्ष :

युरोप रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत भेटीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. अनेक युरोपीय राजदूतांनी भारताला युद्ध संपवण्यासाठी मॉस्कोवर दबाव आणण्यासाठी आपला प्रभाव वापरण्याचं आवाहन केलं आहे. तथापि, दिल्लीनं सातत्यानं असं म्हटलं आहे की संवाद आणि राजनयिकता हाच एकमेव मार्ग आहे, ज्याबद्दल पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे की, “भारत तटस्थ नाही, भारत शांततेच्या बाजूनं आहे.”

भारत पुतिन आणि झेलेन्स्की दोघांच्याही संपर्कात :

दरम्यान, फेब्रुवारी 2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून भारत पुतिन आणि झेलेन्स्की दोघांच्याही संपर्कात आहे. पंतप्रधान मोदींनी झेलेन्स्की यांच्याशी किमान आठ वेळा फोनवर चर्चा केली आहे आणि दोन्ही नेते किमान चार वेळा भेटले आहेत. त्यांची सर्वात अलीकडील चर्चा 30 ऑगस्ट रोजी झाली, जेव्हा पंतप्रधान मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेसाठी चीनमधील तियानजिन येथे आले होते.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts