Breaking News :
  • Home
  • क्रीडा
  • अर्शद खाननं 9 धावांत घेतले 6 बळी; विक्रमी कामगिरीसह सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत रचला इतिहास
क्रीडा

अर्शद खाननं 9 धावांत घेतले 6 बळी; विक्रमी कामगिरीसह सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत रचला इतिहास

Indian bowler Arshad Khan celebrating after taking 6 wickets for 9 runs in the Syed Mushtaq Ali Trophy, creating a new record
97

Arshad Khan 6 wickets spell : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 मध्ये सध्या ग्रुप स्टेजचे सामने सुरु आहेत, मध्य प्रदेश आणि चंदीगड यांच्यातील ग्रुप बी सामना 6 डिसेंबर रोजी जादवपूर विद्यापीठाच्या मैदानावर खेळवण्यात आला. यात मध्य प्रदेशचं प्रतिनिधित्व करणाऱ्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाज अर्शद खाननं उल्लेखनीय गोलंदाजी करत स्पर्धेच्या इतिहासात एक नवा विक्रम प्रस्थापित केला. अर्शदनं त्याच्या चार षटकांमध्ये फक्त नऊ धावा देत सहा विकेट्स घेतल्या, ज्यामुळं मध्य प्रदेशने चंदीगडला 20 षटकांमध्ये फक्त 134 धावांवर रोखलं आणि सामना सात विकेट्सनं जिंकला.

हे ही वाचा : कसोटी वनडेनंतर आता भारत-दक्षिण आफ्रिकेत रंगणार टी-20 चा थरार; कधी होणार सामने?

स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजी :

डावखुऱ्या वेगवान गोलंदाज अर्शद खाननं आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या इतिहासात एकाच सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी आकडेवारी गाठली आहे. अर्शद खाननं 2023 च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 13 धावा देत 6 विकेट्स घेणाऱ्या अर्जून नागवासवाला आणि टी. रवी तेजा यांचा विक्रम मोडला. यादीत तिसऱ्या क्रमांकावर सर्व्हिसेसचे डी.एस. पूनिया आहेत, ज्यांनी 14 धावांत 6 बळी घेतले, तर बडोद्याचा स्वप्नील सिंग 19 धावांत 6 बळी घेऊन चौथ्या क्रमांकावर आला. चंदीगडविरुद्धच्या सामन्यात अर्शद खाननं 9 धावा देत 6 बळी घेतले आणि एक मेडन षटकही टाकलं.

 

मध्य प्रदेश विजयासह सुपर लीग टप्प्यात :

या सामन्यात मध्य प्रदेशला 135 धावांचं लक्ष्य देण्यात आलं होतं. हर्ष गवळीच्या नाबाद 74 आणि हरप्रीत सिंग भाटियाच्या 48 धावांमुळं त्यांनी सामना सहज जिंकला. यासह, मध्य प्रदेश सुपर लीग टप्प्यात पोहोचला आहे, परंतु त्यांचा शेवटचा सामना महत्त्वाचा आहे. मध्य प्रदेश सध्या सहा सामन्यांनंतर एलिट ग्रुप बी पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे, चार विजय आणि दोन पराभव आणि 1.121 च्या नेट रन रेटसह असलेसा मध्य प्रदेश 8 डिसेंबर रोजी जम्मू आणि काश्मीरविरुद्ध त्यांचा शेवटचा सामना खेळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts