ED raid at Shilpa Shetty house : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आता पुन्हा कायदेशीर कचाट्यात अडकली आहे. त्यांच्या मुंबई येथील घरावर ED ने छापेमारी केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हे प्रकरण शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अंगलट येऊ शकते. किंवा जेल मध्ये देखील जावे लागू शकते.
शिल्पा शेट्टीच्या निवासस्थानी इनकम टॅक्स म्हणजेच ED ने छापेमारी केल्याची घटना उघड झाली आहे. शिल्पा शेट्टी यांच्या मालकीचे बॅस्टियन रेस्ट्रॉरंट येथील कर अनियमितता आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या काही तासांपासून ED चे पथक शिल्पा शेट्टीच्या घरात कागदपत्रे आणि त्यांच्या संपत्ती संबंधित पडताळणी करत आहे.
हे ही वाचा : द राजा साब चित्रपटाची नायिका निधी अग्रवाल अडकली गर्दीत
मोठी करचोरी उघड होण्याची शक्यता
शिल्पा शेट्टीच्या घरावर छापेमारी करण्यापूर्वी ED ने बेंगळूरु येथील सेंट मार्क्स रोडवर असलेल्या बॅस्टियन पबवर छापा टाकला होता. रेस्ट्रॉरंटच्या व्यवस्थापनात आणि कर भरण्याच्या प्रक्रियेमध्ये नियमितता नसल्याने ही छापेमारी करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. या छापेमारीवेळी ED च्या अधिकाऱ्यांनी रेस्टोरंट आणि संबंधित सर्व कंपन्यांचे आर्थिक रेकॉर्ड आणि कागदपत्रे ताब्यात घेतले. यामुळे मोठी करचोरी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय म्हणाले शिल्पा शेट्टीचे वकील
शिल्पा शेट्टीच्या घरावर आणि रेस्ट्रॉरंटवर झालेल्या छापेमारीप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने खुलासा केला आहे. तिने हे वृत्त फेटाळून लावले असून त्यांच्या वकिलाने सांगितले कि, रेस्तोरंट किंवा घरावर कोणत्याही प्रकारचा छापा टाकण्यात आलेला नाही. ED चे अधिकारी रुटीन व्हेरीफिकेशनसाठी आल्याचे त्यांनी सांगितले. शिल्पा शेट्टी यांचे वकील प्रशांत पाटील यांनी निवेदन जारी करत सांगितले कि, आयकर विभागाने कोणत्याही प्रकारची छापेमारी किंवा कारवाई केलेली नाही. केवळ नियमित पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.












