Breaking News :
  • Home
  • देश
  • दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग मध्ये अंदाधुंद गोळीबार, 20 जणांना लागल्या गोळ्या; 3 लहान मुलांसह 11 जणांचा मृत्यू
देश

दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग मध्ये अंदाधुंद गोळीबार, 20 जणांना लागल्या गोळ्या; 3 लहान मुलांसह 11 जणांचा मृत्यू

Police and emergency services at the scene after a deadly shooting in Johannesburg South Africa

Johannesburg shooting incident : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गच्या पश्चिमेला अंदाधुंद गोळीबार झाला आहे. या गोळीबारात 20 जणांना गोळ्या लागल्या आहेत. यात 3 मुलांसह 11 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सांगितलं की हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले आहेत आणि अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. हल्ल्यामागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. रस्त्यावरून चालत असताना अनेक लोकांना लक्ष्य करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

हे ही वाचा : एपस्टाईन फाइल्स प्रसिद्ध झाल्या, पण त्या ट्रम्पला वाचवण्यासाठी वेगळाच डाव; नव्या वादाला सुरुवात

अज्ञात हल्लेखोरांकडून हल्ला :

या घटनेबाबत गौतेंग प्रांतीय पोलीस प्रवक्त्या ब्रिगेडियर ब्रेंडा मुरिडिली म्हणाल्या, “हल्लेखोर कोण होते याबद्दल आमच्याकडे कोणतीही माहिती नाही. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.” दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणींजवळ असलेल्या दारूच्या दुकानाजवळ गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी सांगितलं की, त्या ठिकाणी बेकायदेशीर दारू देखील विकली जात होती.

 

दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी :

या महिन्याच्या सुरुवातीला 6 डिसेंबर रोजी प्रिटोरियाजवळील एका वसतिगृहावर बंदूकधारींनी हल्ला केला होता. या हल्ल्यात तीन वर्षांच्या मुलासह बारा जणांचा मृत्यू झाला होता. अधिकृत आकडेवारीनुसार, दक्षिण आफ्रिकेत हिंसक गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे, ज्यामध्ये जगातील सर्वाधिक खून दर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts