• Home
  • मनोरंजन
  • नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रभासच्या स्पिरीटचे पहिले पोस्टर रिलीज; प्रभास शर्टलेस अवतारात
मनोरंजन

नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रभासच्या स्पिरीटचे पहिले पोस्टर रिलीज; प्रभास शर्टलेस अवतारात

Prabhas seen in a shirtless intense look in Spirit movie first poster

Prabhas Spirit first poster : आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली. आपण 2025 हे वर्ष सोडून 2026 या वर्षात पदार्पण केले. या नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रभासच्या नवीन चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशीच दिग्दर्शकाने चाहत्यांना सरप्राईज दिले आहे.

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित स्पिरिट या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर काल सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमध्ये साऊथ अभिनेता प्रभास सह तृप्ती डिमरी यांचा आकर्षक अंदाज दिसला. यामुळे सोशल मीडियावर हे पोस्टर प्रचंड व्हायरल झाले आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास रात्री 12 वाजता स्पिरीटचे पोस्टर शेअर करण्यात आले.

काय आहे पोस्टरमध्ये

या पोस्टरमध्ये अभिनेता प्रभास दमदार अवतारात दिसला. तो कॅमेऱ्याकडे पाठ करून उभा असल्याचं दिसत असून त्याच्या शरीरावर जखमा दिसत आहे. या पोस्टर मध्ये याचे लांबसडक केस, दाट दाढी मिशी, त्याचा हात आणि पाठीवर पट्ट्या बांधलेल्या दिसत आहे. एकंदरीत या पोस्टर मध्ये प्रभासची व्यक्तिरेखा हिंसक दिसत असून शर्टलेस लूकमध्ये त्याचा बेफिकीरपणा दिसत आहे. तर पोस्टर मधील दुसरे कॅरेक्टर म्हणजे अभिनेत्री तृप्ती डिमरी. ती या पोस्टर मध्ये प्रभासच्या जवळ उभी आहे. ती साधारण आणि सौम्य रंगाच्या साडीत शांततेत प्रभासची सिगारेट पेटवताना दिसत आहे.

पोस्टरमध्ये दोघांमध्ये शांतता वाटत असली तरीही त्यामागील ताणतणाव आणि भावनिक गुंतागुंत स्पष्ठपणे जाणवते. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये दिग्दर्शकांनी लिहिलंय कि, तुम्ही आधी पाहिलेल्यावर प्रेम केले. आता जे कधीच माहिती नव्हते त्यावर प्रेम करा. या पोस्टरवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला असून अनेकांनी चित्रपट प्रदर्शित होण्याची उत्सुकता दर्शवली आहे. तर काहींनी नववर्षाचे हे गिफ्ट असल्याचे सांगितले आहे.

हे ही वाचा : काळ्या रंगाचा हाय स्लिट गाऊन, हातात बंदूक; नयनताराचा Toxic किलर अवतार

हे कलाकार असणार मुख्य भूमिकेत

या चित्रपटात अनेक कलाकार असणार आहे. मुख्य भूमिकेत प्रभास, तृप्ती डिमरी, विवेक ओबेरॉय, कांचना आणि प्रकाश राज असणार आहे. प्रभास एक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार असून तृप्ती प्रेयसीच्या भूमिकेत असेल. हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts