Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या नूतन वर्षाच्या शुभेच्छा
Top News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या नूतन वर्षाच्या शुभेच्छा

Maharashtra CM Devendra Fadnavis and Deputy CMs wishing citizens on New Year
99

Devendra Fadnavis New Year Wishes : आजपासून 2026 या वर्षांची सुरुवात झाली.आज नवीन वर्षानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहे. नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त करून त्यांनी नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्ष प्रारंभाच्या पुर्वसंध्येला दिलेल्या या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ‘सरत्या वर्षातील कटू प्रसंगांना विसरूया आणि सुमधूर आठवणींकडून प्रेरणा घेत, पुढे जाऊया. महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर, नेतृत्व करणारे राज्य आहे. महाराष्ट्राची प्रगतीची पताका अशीच फडकत राहो, यासाठी आपण एकजूट करूया. महाराष्ट्राच्या मातीत आव्हाने स्वीकारण्याची धमक आहे. आव्हाने आलीच, तर त्यावर मात करण्याचा निर्धार करुया. नवे वर्ष नवचैतन्य घेऊन येणारे, आशा, आकांक्षांना बळ देणारे ठरेल अशी आशा व्यक्त करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नववर्ष सर्वांसाठी आरोग्यदायी, सर्वच क्षेत्रात भरभराट, समृद्धी घेऊन येणारे ठरावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.

नववर्षाचं स्वागत उत्साहात, मात्र संयम आणि आरोग्यभान राखत करावं- अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राज्यातील जनतेला नववर्ष २०२६ च्या शुभेच्छा सोशल मीडियावर दिल्या. ते म्हणाले, नवीन वर्ष महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या मार्गावर अधिक वेगानं पुढे घेऊन जाईल, अशी खात्री आहे. नववर्षाचं स्वागत उत्साहात, मात्र संयम आणि आरोग्यभान राखत करावं, असं आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

महाराष्ट्रवासियांच्या एकजूट आणि निर्धाराच्या बळावर राज्यानं आतापर्यंत प्रत्येक आव्हानावर यशस्वीपणे मात केली आहे. ही एकजूट कायम ठेवत विकासाची वाटचाल अधिक भक्कम करण्याचा शासनाचा ठाम संकल्प आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी साहेब यांच्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पपूर्तीत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, त्याअनुषंगानं राज्याची अर्थव्यवस्था २०२८ पर्यंत एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचं ध्येय निश्चित करण्यात आलं आहे.

 


>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>lass=”yoast-text-mark” />>महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा एकमेव अजेंडा असून, त्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा उभारणी, लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसंच शहरी व ग्रामीण भागाचा समतोल विकास साधण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांचा सक्रिय सहभाग, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासह प्रभावी नियोजनाच्या माध्यमातून ‘विकसित महाराष्ट्र’ साकारण्यासाठी ठोस आणि निर्णायक पावलं उचलली जात आहेत.

रक्तदान करून नवीन वर्षाचे स्वागत (Devendra Fadnavis New Year Wishes)

<span class=”transliteration”>याशिवाय नवीन वर्षाचे स्वागत शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते तथाउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करून केलं आहे. ठाणे येथील रक्तदान शिबिरात एकनाथ शिंदे यांनी नवीन वर्षाची सुरवात रक्तदान करून केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व सामान्य नागरिकांशी शिवसेने सोबत रक्ताचं नातं निर्माण करायला सांगायचे. त्यांच्या मार्गदर्शनाने दरवर्षी एकनाथ शिंदे नवीन वर्षाची सुरवात रक्तदान शिबिरात रक्तदान करून करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts