Makar Sankranti vaan tradition : नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. महाराष्ट्रातील महिलांसाठी महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती. हा हिंदू पंचांगानुसार अत्यंत महत्वाचा सण मानला जातो. मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या सणाला नवीन ऋतूची आणि शुभकार्याची सुरुवात मानली जाते. खासकरून महिलांना हा सण प्रचंड आवडतो. यामागील कारण म्हणजे हळदी–कुंकू आणि वाण देण्याची खास परंपरा.
मकर संक्रांतीला हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला जातो. या कार्यक्रमात महिला वर्ग आळीपाळीने प्रत्येकाच्या घरात हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवतात आणि एकमेकींना वाण देतात. तुम्हाला माहिती आहे का ही वाण देण्याची परंपरा कशी सुरु झाली. चला जाणून घेऊया या लेखात.
मकर संक्रांतीला वाण देण्याची परंपरा
महाराष्ट्रातील महिलांसाठी मकर संक्रांत हा सण खास मानला जातो. या दिवशी हळदी कुंकू लावून वाण देण्याची सुंदर परंपरा साजरी केली जाते. वाण देणे हे फक्त औपचारिकता नसून सौहार्द, गोडवा आणि नातेसंबंध दृढ करण्याचा संदेश दडलेला आहे. या परंपरेमुळे नातेसंबदनही दृश्य होतात. महिलांमध्ये स्नेह आणि एकोप्याची भावना निर्माण होते. हेच या परंपरेमागील रहस्य आहे. पूर्वीच्या काळात महिला आपल्या घरात स्वतः पिकवलेले धान्य, तीळ, गहू, हरभरा हे वाण म्हणून द्यायचे. आणि यासोबत महिलांना हळदीकुंकू लावून “तिळगुळ घ्या गोड गोड बोला” हा संदेश समाजात पोहोचवला जायचा.
तिळगुळाचे पॉकेट आणि सुगड
मकर संक्रांत ही तिळगुळशिवाय अपूर्णच. आपण मकर संक्रांतीला तीळ गूळ घ्या गोड गोड बोला हा संदेश देतो. तुम्ही मकर संक्रांतीला तिळगुळ आणि छान असं ग्रीटिंग कार्ड देऊ शकतात. ज्यामध्ये मकर संक्रांतीच्या सुंदर अशा शुभेच्छा दिलेल्या असतील. तुम्ही हे ग्रीटिंग कार्ड छोट्या साईजमध्ये घरीच तयार करू शकतात. पूर्वी मकर संक्रांतीला वाण म्हणून सुगड देण्याची परंपरा होती. आजही ही परंपरा काही भागात कायम आहे. हे वाण समृद्धी आणि अन्नपूर्णतेचे प्रतीक मानले जाते.
आधुनिक वाण
आजकाल सर्वच बदललंय. या पारंपरिक वाणाची जागा आता आधुनिक युगातील वस्तुंनी घेतली आहे. तुम्ही आजच्या युगात वाण म्हणून अत्यावश्यक वस्तू देऊ शकतात. दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या वस्तू वाण म्हणून देण्याकडे महिलांचा कल दिसून येतो. त्यानुसार तुम्ही स्टील किंवा प्लॅस्टिकच्या वाट्या, डबे, पळी, चमचे, किंवा किचन टॉवेल वाण म्हणून देऊ शकतात.
आरोग्यदायी रोपटे – पर्यावरणाचा संदेश
जर तुम्ही संक्रांतीला एखाद्या वस्तू ऐवजी हटके वाण देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तुळस, कोरफड, पुदिना या वनस्पतिचन्हे छोटे रोपटे देऊ शकतात. यातून पर्यावरणाचा संदेश देखील दिला जाऊ शकतो. हे रोपटे कायम आपल्या आप्तेष्ठांसोबत राहू शकते.
सुगंधी दिवा
तुम्ही वन म्हणून सुगंधी दिवा देखील गिफ्ट म्हणून देऊ शकतात. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हा दिवा घरासाठी देखील उपयुक्त ठरतो. तुम्ही बाजारात उपलब्ध असलेले रंगीत सुगंधी कँडल देखील वाण म्हणून देऊ शकतात.
क्राफ्ट
तुम्ही जर आर्टिस्ट असाल तर घरच्या घरी क्राफ्ट तयार करून वाण म्हणून देऊ शकतात. जसे की होम मेड फ्रिज मॅग्नेट, वॉल हँगिंग, टाकाऊ पासून टिकाऊ अशा काही वस्तू तयार करू शकतात, ज्या की घराला शोभा देतील. जसे की टाकाऊ बॉटल पासून फ्लॉवर पॉट, पेपरपासून फ्लॉवर्स आदी.









