• Home
  • ताज्या बातम्या
  • ना रावण दहन, ना पुतळ्याची राख! ‘या’ गावात १०० वर्षांपासून दसऱ्याला नेमकं काय घडतं? जाणून घ्या एका क्लिकवर!
लाईफस्टाईल

ना रावण दहन, ना पुतळ्याची राख! ‘या’ गावात १०० वर्षांपासून दसऱ्याला नेमकं काय घडतं? जाणून घ्या एका क्लिकवर!

Rajasthan Dussehra Tradition
11
Rajasthan Dussehra Tradition: दसऱ्याला देशभरात रावण दहन केलं जातं, मात्र राजस्थानमधील रोपा गावात ही परंपरा वेगळी आहे. येथे रावणाची मूर्ती जाळण्याऐवजी धनुष्यबाणाने त्याचा प्रतीकात्मक वध केला जातो. जवळपास १०० वर्षांपासून सुरू असलेल्या या अनोख्या परंपरेमागे नेमकी काय कथा आहे? जाणून घेऊया.

Ropa Village Celebrates Dussehra Without Ravana Dahan: दसरा म्हंटल की रावणाचा पुतळा, त्याचे दहन आणि वाईटावर चांगल्याचा विजयाचा उत्सव हे चित्र आपल्या सर्वांच्या डोळ्यांसमोर येतं. मात्र, राजस्थानमधील एका गावात दसरा साजरा (Rajasthan Dussehra Tradition) करण्याची पद्धतच वेगळी आहे. येथे रावणाला जाळलं (Ravana Dahan) जात नाही, तर रामाच्या हातून त्याचा प्रतीकात्मक वध केला जातो. विशेष म्हणजे, या गावात रावणाची मूर्ती गेल्या अनेक वर्षांपासून सांभाळून ठेवण्यात आली आहे. या अंगळ्यावेगळ्या परंपरेमुळे रोपा गावाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.

हेही वाचा: मोठी बातमी! आता कोट्यवधी मुलांना मिळणार SpaceX च्या मालकीत हिस्सा? Elon Musk यांच्या प्लॅनमागचं कारण काय?

राजस्थानमधील रोपा गावाची परंपरा नेमकी काय?

राजस्थानमधील भीलवाडा जिल्ह्यातील शाहपुरा परिसरात रोपा हे गाव (Ropa Village) आहे. या गावाच्या मध्यभागी रावणाची सुमारे १० फूट उंच सिमेंटची मूर्ती उभी आहे. जवळपास शंभर वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली ही मूर्ती आजही गावाच्या परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे.

दसऱ्याच्या आधी गावकरी या मूर्तीची रंगरंगोटी करतात. त्यानंतर रामायणातील (Rajasthan Festival) प्रसंगांवर आधारित कार्यक्रम आयोजित केले जातात. दसऱ्याच्या दिवशी रामाची भूमिका करणारा बालकलाकार धनुष्यबाणाच्या साहाय्याने रावणाचा प्रतीकात्मक वध करतो. इतर ठिकाणी रावणाचा पुतळा जाळला जात असताना येथे मात्र मूर्ती कायमस्वरूपी जतन केली जाते.

दोन दिवस चालतो दसऱ्याचा सोहळा

रोपा गावातील दसरा उत्सव दोन दिवस साजरा ( Vijayadashami Festival Celebrate To Ropa Village) केला जातो. उत्सवाच्या पहिल्या दिवशी लंका दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. भगवान चारभुजानाथ मंदिरातून ठाकूरजींची मिरवणूक काढली जाते. त्यानंतर राम आणि लक्ष्मण यांच्या भूमिका साकारण्यासाठी स्वयंसेवकांची निवड केली जाते.

हनुमानाची वेशभूषा केलेली मुले रावण चौकात पोहोचतात आणि लंका दहनाचा प्रसंग सादर करतात. दुसऱ्या दिवशी दसऱ्याच्या मुख्य सोहळ्यात रामाची भूमिका साकारणारा कलाकार धनुष्यबाणाने रावणाचा वध करतो. हा कार्यक्रम पाहण्यासाठी रोपा गावासह आसपासच्या भागातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

रावणाला केवळ खलनायक मानत नाहीत गावकरी

या परंपरेमागे गावकऱ्यांची एक वेगळी धारणा आहे. स्थानिक पुजारी पंडित सत्यनारायण शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, रोपा गावात रावणाकडे केवळ वाईटाचे प्रतीक म्हणून पाहिले जात नाही. त्याच्या विद्वत्तेमुळेही त्याच्याबद्दल आदर व्यक्त केला जातो.

त्यामुळे रावणाची मूर्ती जाळून नष्ट करण्याऐवजी त्याच्या वधाचा प्रसंग दरवर्षी सादर केला जातो. या प्रथेमुळे गावाची जुनी परंपरा टिकून राहिली आहे. रावणाचा वध आणि त्याची मूर्ती जतन करणे, या दोन्ही गोष्टी गावाच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग बनल्या आहेत.

हेही वाचा: दसऱ्यापासून ‘या’ 6 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस? धनलाभापासून करिअरमधील प्रगतीपर्यंत, जाणून घ्या भविष्य!

रावणाच्या मूर्तीशी जोडल्या गेल्या श्रद्धा

रोपा गावातील रावण चौक हे केवळ दसऱ्याच्या कार्यक्रमाचे ठिकाण नाही. काही ग्रामस्थ या मूर्तीला श्रद्धेचे स्थान मानतात. एखादे काम पूर्ण होत नसल्यास येथे नवस बोलणे, प्रार्थना करणे आणि नैवेद्य अर्पण करणे, अशा प्रथाही पाळल्या जातात.

गावात एका दुष्काळाची कथाही सांगितली जाते. परिसरात पावसाअभावी परिस्थिती गंभीर झाली असताना गावकऱ्यांनी रावणाच्या मूर्तीजवळ रात्रभर जागरण केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस पडल्याची आठवण स्थानिकांकडून सांगितली जाते. या घटनेमुळे रावणाविषयीची श्रद्धा अधिक दृढ झाल्याचे ग्रामस्थ मानतात.

‘रावणाचं गाव’ म्हणून मिळाली ओळख

रावणाचे दहन न करता त्याचा वध करण्याची परंपरा आणि शंभर वर्षांपासून जतन केलेली मूर्ती यामुळे रोपा गावाला परिसरात ‘रावणाचं गाव’ म्हणून ओळखले जाते.

देशातील बहुतांश भागांत दसऱ्याच्या दिवशी रावण दहन केले जाते. मात्र, रोपा गावात रामायणातील वधाचा प्रसंग सादर करून रावणाची मूर्ती कायम ठेवली जाते. स्थानिक इतिहास, श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरा यांचा संगम असलेला हा उत्सव राजस्थानमधील दसऱ्याच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरांपैकी एक मानला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts