Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • आज गणेश जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात दर्शनाला पहाटेपासूनच गर्दी; 12 वाजता पार पडणार गणेशजन्म सोहळा
Pune

आज गणेश जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात दर्शनाला पहाटेपासूनच गर्दी; 12 वाजता पार पडणार गणेशजन्म सोहळा

Ganesh Jayanti Dagdusheth Ganpati

Ganesh Jayanti Dagdusheth Ganpati : आज माघ शुद्ध चतुर्थी म्हणजे माघी गणेश जयंती आहे. यानिमित्त आज विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात भक्तीचा अथांग सागर लोटला आहे. भाविक भक्तांनी पुण्याचे ग्रामदैवत आणि कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे.

गणेशजन्म सोहळा दुपारी 12 वाजता आयोजित

आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने यंदाचा गणेश जन्म सोहळा आयोजित करण्यात आला आहे. विनायक अवतार असलेला हा गणेशजन्म सोहळा यंदा देखील सुवर्णपाळण्यामध्ये दुपारी 12 वाजता होणार आहे. यंदा स्वराभिषेक, गणेशयाग, श्री गणेश जागर, नगरप्रदक्षिणा असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत.

हे ही वाचा :  वास्तुदोषामुळे जाणवतेय आर्थिक समस्या; करा या मंत्रांचा जप

गणपती बाप्पांना मौल्यवान सोने आणि हिऱ्याचे दागिने मढवण्यात आले

आज गणेश जयंतीच्या निमित्ताने गणपती बाप्पांना मौल्यवान सोने आणि हिऱ्याचे दागिने मढवण्यात आले आहे. दगडूशेठ गणपतीला मनातील इच्छा पूर्ण करणारा गणपती म्हणून ओळखले जाते. आज बाप्पासाठी चॉकलेटचा खास नैवेद्य अर्पण करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण मंदिराला आकर्षक पुष्पसजावट व विद्युतरोषणाई करण्यात आली असून आज पहाटे 3 वाजेपासून ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक करण्यात आला. याशिवाय गणेशसुक्त अभिषेक देखील मंदिरात सुरु करण्यात आला आहे. तसेच सकाळी 6 ते 10 आणि दुपारी 1.30 ते सायंकाळी 5 यावेळेत गणेश याग होणार आहे.

नगरप्रदक्षिणा मिरवणूक सायंकाळी 6 वाजता निघणार

मुख्य गणेशजन्म सोहळ्याला दुपारी 12 वाजता सुरुवात होणार आहे. यामध्ये पारंपरिक वेशात महिला सहभागी होणार आहेत. जन्माच्या वेळी पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे. यावेळी गणेशाची मंगल आरती होईल. नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात येणार असू सायंकाळी 6 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरापासून निघणार आहे. त्यानंतर रात्री 8 वाजता श्रीगणेशाची मंगलआरती होईल. रात्री 10 ते पहाटे 3 वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला आहे. गणेशजन्माच्या दिवशी पहाटे 3 वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुले राहणार आहे. तरी भाविकांनी विविध कार्यक्रमांत सहभागी होत दर्शनाचा लाभ घ्यावा, असे ट्रस्टतर्फे कळविण्यात आले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts