Homebound Oscar 2026 : धर्मा प्रॉडक्शन प्रस्तुत नीरज घायवान दिग्दर्शित होमबाउंड हा चित्रपट ऑस्कर 2026 साठी पात्र ठरला होता. परंतु आता हा चित्रपट ऑस्कर 2026 च्या यादीतून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. आगामी 98 व्या अकादमी पुरस्कारासाठी होमबाउंड चित्रपट शॉर्टलिस्ट झाला होता. या पुरस्कारासाठी हा चित्रपट बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म या विभागासाठी पात्र ठरला. परंतु नुकतंच नामांकन यादी जाहीर झाली. या यादीत ऑस्करच्या शर्यतीतून होमबाउंड बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले.
बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्मसाठी शॉर्टलिस्ट ठरला होता
धर्मा प्रॉडक्शनने याबाबत पोस्ट शेअर करत 98 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्मसाठी होमबाऊंड चित्रपट शॉर्टलिस्ट झाल्याची माहिती दिली होती. होमबाउंड या भारतीय चित्रपटात ईशान खट्टर आणि विशाल जेठवा यांची मुख्य भूमिका आहे. भारताच्या होमबाऊंड चित्रपटासह अर्जेंटिना येथील Belen , ब्राझील चा THE Secret Agent , फ्रान्सचा It Was Just An असिसिडेन्ट, जर्मनीचा Sound of Falling यासारख्या इतर देशातील चित्रपटांना ऑस्कर 2026 साठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे.
And the nominees for Best Picture are… #Oscars pic.twitter.com/khoVsDQlnZ
— The Academy (@TheAcademy) January 22, 2026
भारताला चित्रपटाकडून होत्या अपेक्षा
भारतातून अधिकृत प्रवेश म्हणून होमबाउंड चित्रपट पाठवण्यात आला होता. परंतु आता ऑस्करच्या शर्यतीत हा चित्रपट फार काळ टिकू शकला नाही. ऑस्करसाठी शॉर्टलिस्टेड झाल्यानंतर अनेकांनी होमबाउंड चित्रपटाबद्दल सर्च केले होते. भारताला या चित्रपटातून प्रचंड अपेक्षा होत्या. परंतु त्या अपेक्षा हा चित्रपट पूर्ण करू शकला नाही. यापूर्वी ऑस्कर म्हणजे अकादमी पुरस्कारासाठी भारतातील फक्त 3 चित्रपट नॉमिनेट झालेले आहे. तर टॉप 15 मध्ये आलेले भारतीय चित्रपटांमध्ये एका गुजराती चित्रपटाचा समावेश आहे.
हे ही वाचा : होमबाऊंड चित्रपटापूर्वी ‘हे’ भारतीय चित्रपट देखील होते ऑस्करच्या यादीत
काय आहे चित्रपटाची कथा
होमबाउंड या चित्रपटाची कथा ही बालमित्र शोएब (ईशान खट्टर) आणि चंदन (विशाल जेठवा) यांच्याभोवती फिरताना दिसते. चित्रपटातील हे दोन पात्र पोलीस भरतीचे स्वप्न उराशी घेऊन चालत असतात. हे स्वप्न त्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचे काम करते.चित्रपटातील जान्हवी कपूरची भूमिका मैत्री, कर्तव्य आणि खास म्हणजे आजच्या या तरुण भारतासमोरील दबाव यांची भावनिक मांडणी दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट कारण जोहर, आदर पुनावाला आणि अपूर्वा मेहता यांनी निर्मित केला आहे. होमबाउंड या चित्रपटाने यापूर्वी कान्स 2025, TIFF मध्ये भव्य प्रेझेन्टेशन देत International Audience Choice या अवॉर्डसाठी Second Runner Up मध्ये स्थान पटकावले आहे.












