• Home
  • राजकारण
  • बाळासाहेबांच्या जन्म शताब्दीनिमित्त संजय राऊतांचा मोंदीवर निशाणा
Top News

बाळासाहेबांच्या जन्म शताब्दीनिमित्त संजय राऊतांचा मोंदीवर निशाणा

Sanjay Raut attack on Modi

Sanjay Raut attack on Modi : राज्यभरात आज बाळासाहेब ठाकरे यांची १०० वी जयंती साजरी केली जात आहे. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर व्हायला पाहिजे, अशी भावणी शिवसैनिकांची आहे. हाच धागा धरून शिवसेनेचे नेत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहेत. पंतप्राधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांच्या आठवणीत समाज माध्यमांवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यावरून खासदार राऊत यांनी भाजपसह मोंदीवर हल्ला चढवला आहे. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर देखील आपली तोफ डागली आहे. तर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वादावर मात्र त्यांनी भाष्य करणे टाळले आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या निशाण्यावर आलेल्या सर्वांच्या ते आपल्या तीव्र आणि तिष्न भात्याने अनेकांना घायाळ करण्याचे काम करतात. त्याचा प्रत्यक्ष आज पुन्हा एकदा आलाय.

हेही वाचा – राज्यातील १२ जिल्हा परिषदांसाठी ७,६९५ तर १२५ पंचायत समित्यांसाठी १३,०२३ अर्ज दाखल 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटो एक्स या सोशल मिडियावर शेअर केला आहे. बाळासाहेब ठाकरे हे कसे त्यांचे मार्गदर्श होते. आम्ही त्यांच्याकडून कशी राजकीय प्रेरणा घेतली. आम्हाला त्यांच्यापासून कशी मिळाली. त्यांनी महाराष्ट्राचा आणि देशाला कशी दिशा दाखवली, अशी विविध विशेषणे वापरून त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. तशी पोस्ट त्यांनी केली आहे.

मोदी एकनाथ शिंदे यांच्याकडून उर्जा, प्रेरणा आणि मार्गदर्शक घेतात

मात्र, मोदींनी त्याच बाळासाहेबांची शिवसेना तोडली, फोडली आणि शिवसेना प्रमुख पदावर एकनाथ शिंदे नावाच्या व्यक्तीला बसवलं. आता मोदी एकनाथ शिंदे यांच्याकडून उर्जा, प्रेरणा आणि मार्गदर्शक घेतात का? असा खोटक टोला राऊतांनी यावेळी लगावला. लोकमान्य टिळकानंतर बाळासाहेब ठाकरे हे लोकमान्य नेते होते. आज शिवसेनेतर्फे जनशताब्दी वर्षानिमित्त षणमुखानंद हॉलला एक कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे हजर असतील अशी महिती संजय राऊत यांनी दिली.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिंदे सेना- मनसे युतीवर भाष्य टाळलं

बाळासाहेबांनी देशाला आणि महाराष्ट्राला फार मोठा विचार दिला. तो म्हणजे भक्कम एकजुटीचा. मराठी माणूस असेल अथवा हिंदू माणूस असेल, ऐक्याची वज्रमूठ ही कोणत्याही संकटांशी सामना करू शकते. त्यांनी ते दोन्ही ठिकाणी करून दाखवले. सामान्य माणसाला त्यांनी शूर करून दाखवलं. तर त्याच्या न्यायहक्काची जाणीव करून दिली. त्यामुळं बाळासाहेबांचं स्मरण आम्हाला सारखं होत असतं. महाराष्ट्राला त्यांचं विस्मरण कधीच होणार नाही, असे राऊत म्हणाले. तर यावेळी त्यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिंदे सेना- मनसे युतीवर भाष्य करणं टाळलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts