Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • अल्पवयीन मुलीला त्रास, आरोपी विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
गुन्हा

अल्पवयीन मुलीला त्रास, आरोपी विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

POCSO Case for Harassment of Minor

POCSO Case for Harassment of Minor : वाशिम शहरात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग, तिचा मानसिक छळ, तिच्यावर जबरी लग्नासाठी दबाव, कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी, आणि मध्यरात्री घरात घुसून दहशत निर्माण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वाशिम शहर पोलिसांनी दोन मुलांचा बाप असणाऱ्या शेख शाहरूख शेख गफुर या 35 वर्षीय आरोपी वर पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून पुढील तपास वाशिम शहर पोलीस करीत आहेत.

हेही वाचा – लोकलमधून उतरण्याच्या किरकोळ वादातून प्राध्यापकाची चाकू भोसकून हत्या

२३ जानेवारीच्या मध्यरात्री आरोपी थेट पीडितेच्या घरी पोहोचला गेट वाजवलं आणि दरवाजा उघडताच बळजबरीने घरात घुसला. घरच्यांनी विरोध केला असता आरोपीने हुज्जत घालून मी तुझ्या मुलीशी लग्न करणार लग्न लावून दिलं नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली. एवढंच नाही तर गेटवर फाशी घेण्याची धमकी देत तो पळून गेला काही वेळ आरोपीने दहशत माजवली होती.

मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी गेल्या ११ महिन्यांपासून पीडित मुलीचा सतत पाठलाग करत होता. मुलगी दुकानात एकटी असताना सलगी करण्याचा प्रयत्न, क्लासला जाताना पाठलाग, तसेच वारंवार लग्नाचा तगादा लावत दबाव टाकल्याचा आरोप आहे. काही महिन्यांपूर्वी आरोपीने मुलीला बोलण्यासाठी मोबाईल दिल्याची माहिती असून त्यावरून सतत कॉल्स आणि मेसेज करून त्रास दिला जात होता.

या घटनेनंतर पीडितेच्या आईने शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार आरोपीवर BNS कलम ३३३, ७८(२), ३५१(२), ३५१(३) आणि पोक्सो कलम १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीला अटक केली आहे पुढील तपास वाशिम शहर पोलीस करीत असल्याचे पोलीस निरीक्षक चौधरी यांनी सांगितले.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts