Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • नवऱ्यानंतर मुलगाही गमावला…. लाडक्या प्रथमेश कदमचे निधन; मित्राने दिली याबाबत माहिती
Top News

नवऱ्यानंतर मुलगाही गमावला…. लाडक्या प्रथमेश कदमचे निधन; मित्राने दिली याबाबत माहिती

Realstar prathamesh kadam passes away

Realstar prathamesh kadam passes away  : सोशल मीडियावरील प्रसिद्ध मराठी इन्फ्लुएन्सर आणि रील स्टार प्रथमेश कदम यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली हे. प्रथमेशच्या निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला असून चाहत्यांकडून सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prathamesh kadam (@_prathamesh_kadam)

सोशल मीडियावर पोस्ट करत मित्राने दिली माहिती

प्रसिद्ध मराठी इन्फ्लुएन्सर आणि रीलस्टार प्रथमेश कदम याचे निधन झाले आहे. याबाबत त्याचा मित्र तन्मय पाटेकर याने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. त्याच्या निधनाने चाहत्यांना आणि फॉलोअर्सला मोठा धक्का बसला आहे. इंस्टाग्रामवर प्रथमेश आणि त्याची आई प्रचंड लोकप्रिय आहे. दोन्ही मायलेकांचे रिल्स सोशल मिडीयाव तुफान व्हायरल होतात. एवढेच नाही तर प्रेक्षकांना दोघांचे रिल्स प्रचंड आवडतात. प्रथमेश कदम यांच्या निधनाचे नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट झाले नसून आजारपणामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

देवाघरी स्वत:ची काळजी घे रे

प्रथमेशच्या मृत्यूची बातमी त्याचा मित्र आणि सोशल मीडिया स्टार तन्मय पाटेकर याने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. तू सदैव आठवणीत राहशील प्रथमेश. देवाघरी स्वत:ची काळजी घे रे, खूप आठवण येईल तुझी, मिस यू भाई’ अशा आशयाची पोस्ट करत त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या. तन्मयने प्रथमेशचा फोटो देखील शेअर केला. त्याने केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

हे ही वाचापद्म पुरस्कार २०२६ ची घोषणा! महाराष्ट्रातील खालील व्यक्तींचा पुरस्कारने सन्मान

नवऱ्यानंतर मुलगाही गमावला

प्रथमेश कदम त्याची आई प्रज्ञा कदम हे दोघे मिळून सोशल मीडियावर रिल्स बनवत होते. त्याच्या वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण घराची जबाबदारी प्रथमेशच्या खांद्यावर पडली होती. त्याने आईला धीर देत घर सांभाळले. आईसोबत मिळून तो रिल्स बनवत होता. या रिल्सव चाहत्यांकडून चांगलं प्रतिसाद मिळ असे. नवऱ्यानंतर मुलाच्या निधनामुळे प्रज्ञा कदम यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रुग्णालयातून देखील केले हसवण्याचे काम

2025 मध्ये प्रथमेशने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओ मध्ये त्याची फसवणूक झाल्याची माहिती त्याने दिली होती. याशिवाय त्याला झालेल्या आजारपणाबद्दल देखील तो बोलता झाला होता. आजारी असताना देखील त्याने हसवण्याचे काम सोडले नाही. रुग्णालयातून देखील व्हिडीओ बनवत चाहत्यांना हसवण्याचे काम त्याने केले.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts