Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • दादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर, घड्याळाला मतदान करा; मंत्र्याचे मतदारांना आवाहन
Top News

दादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर, घड्याळाला मतदान करा; मंत्र्याचे मतदारांना आवाहन

Vote for Clock Tribute Appeal

Vote for Clock Tribute Appeal : अजित दादांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली व्हायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसने उभा केलेले जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीच्या सर्व उमेदवारांना इंदापूरकरांनी मतदान करावं, असं आवाहन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काटी येथील जाहीर सभेमध्ये केला आहे.

काटी लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या प्रचारार्थ मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची प्रचार सभा पार पडली आहे. या सभेत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एकापाठोपाठ एक हे विधानं केली आहेत.

हेही वाचा – ‘पडद्यामागे काहीतरी गूढ… अजित पवारांच्या मृत्यूत भाजपाचा हात’; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

उद्या विरोधक घोंगडी बैठका घेतील तुमच्यात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतील मात्र कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. इंदापुरात उभा करण्यात आलेले २४ च्या २४ उमेदवार हे घड्याळाचे आहेत आणि अजित दादांचे आहेत. आम्ही २४ च्या २४ उमेदवार इंदापूर मधून निवडून देऊ असा शब्द दादांना दिला होता त्यामुळे आता तो शब्द आपल्याला पूर्ण करायचा आहे असं भरणे यांनी म्हटलं आहे.

तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे इंदापूरच्या काट येथील जाहीर सभेत बोलताना म्हणाले, मी निरवांगी मध्ये असताना सगळ्यांना सांगितल आहे, आपण खऱ्या अर्थाने या उमेदवारांना विजयी करून अजितदादांना श्रद्धांजली वाहूया अशा पद्धतीचा आव्हान माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे.

एकंदरीत पाहता अजित पवार यांच्या निधनानंतर इंदापूर तालुक्यात अजित पवार यांच्या श्रद्धांजलीच्या नावाखाली मतदारांना मतदान करण्याचं आव्हान केलं जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts