Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • शाळकरी मुलांची हातात कोयता घेऊन भरदिवसा दहशत, विद्यार्थ्यांना शिवीगाळ करत धमकावले
Top News

शाळकरी मुलांची हातात कोयता घेऊन भरदिवसा दहशत, विद्यार्थ्यांना शिवीगाळ करत धमकावले

Schoolchildren creating a ruckus with sickles in their hands

Terror of school children with koyta in hand : छत्रपती संभाजीनगर शहरातील (Sambhaji Nagar crime news) रामनगर परिसरात दोन अल्पवयीन मुलांनी हातात कोयते घेऊन धिंगाणा (Schoolchildren creating a ruckus with sickles in their hands) घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘आम्ही डॉन आहोत डॉन’ (We are the Don, the Don) असे ओरडत या मुलांनी भरदिवसा महिला आणि शाळकरी मुलांना शिवीगाळ (School students were threatened) करत धमकावले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण (An atmosphere of terror prevails in the area) पसरले असून वाढत्या गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

हेही वाचा – प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून, पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य उघड

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास १७ व १६ वर्षीय दोन अल्पवयीन मुले रामनगरमधील एका किराणा दुकानाजवळ उभी होती. यावेळी त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या महिला आणि विद्यार्थ्यांसमोर शाळेतील बॅगेतून धारदार कोयता बाहेर काढला. जेव्हा एका नागरिकाने या कृत्याचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ‘काय व्हिडिओ काढता रे, आम्ही डॉन आहोत’ असे म्हणत त्यांनी धमकी दिली आणि कोयता दप्तरात लपवून पळ काढला. मात्र, काही वेळ या परिसरात दहशतीचे वातावरण पाहायला मिळाले.

दोन्ही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

स्थानिक नगरसेवक मनोज गांगवे यांनी या प्रकाराची माहिती मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन इंगळे यांना दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुरुवारी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, यातील दोघेही नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे विद्यार्थी आहेत. दप्तरात कोयता लपवून फिरणाऱ्या या मुलांच्या कृत्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

गुंडांच्या दहशतीमुळे नागरिक आधीच त्रस्त

आधीच अवैध धंदे, कुख्यात गुंडांमुळे स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण असताना आता शाळकरी मुलंही गुन्हेगारीच्या मार्गावर जात असल्याचे भयाण वास्तव समोर आल्याने चिंता व्यक्त होत आहे. अधिक माहितीनुसार, व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दोन ते तीन शाळकरी लहान मुलं एका दुचाकीजवळ उभे आहेत. त्यापैकी एकाच्या हातात मोठा कोयता असून, तो तो हवेत फिरवत असल्याचे दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, भररस्त्यातून महिलांची ये-जा सुरू असतानाही या मुलांना कशाचीही भीती वाटत नाही.

महिलांकडे पाहून हातवारे करण्याचा प्रकार

उलट, कोयता दाखवून ते परिसरात आपली दहशत असल्याचे भासवत आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही लहान मुले शाळेच्या बॅगा घेऊन तिथून जात असताना कोयता बाळगणारी तीन चार मुलंही त्यांच्यासोबतच थांबल्याचे दिसून आले. तिथून जाणाऱ्या महिलांकडे पाहून मुलं उपरोधिकपणे हसताना आणि हातवारे करताना दिसत आहेत.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts