• Home
  • ताज्या बातम्या
  • अंडर-१९ वर्ल्ड कप : वैभव सुर्यवंशीने उडवला इंग्रजांचा धुव्वा, १५ षटकार अन् १५ चौकरांसह १७५ धावांची खेळी
Top News

अंडर-१९ वर्ल्ड कप : वैभव सुर्यवंशीने उडवला इंग्रजांचा धुव्वा, १५ षटकार अन् १५ चौकरांसह १७५ धावांची खेळी

Vaibhav Suryavanshi's innings of 175 runs

Under-19 World Cup : इंग्लंडविरुद्ध झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताचा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने शानदार फलंदाजी करत इतिहास रचला. वैभवने १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात सर्वात जलद शतक तर केलेच पण सर्वात लांब डाव खेळणारा फलंदाजही बनला. मात्र, १४ वर्षांचा हा खेळाडू द्विशतकही हुकला. वैभवने १५ षटकार आणि १५ चौकारांच्या बळावर केवळफक्त ८० चेंडूत  १७५ धावा केल्या. त्यापैकी १५० धावा चौकार आणि षटकारांसह बनवल्या होत्या.

हेही वाचा – दिल्लीचा सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पराभव; RCB नं दुसऱ्यांदा जिंकली WPL ट्रॉफी

वैभव सूर्यवंशीने इंग्लंडविरुद्धच्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात २१८.७५ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्याने १७५ धावांच्या खेळीत १५ चौकार आणि १५ षटकार मारले. या खेळीदरम्यान, वैभवने १९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद १५० धावा करण्याचा विक्रम केला. त्याने ७१ चेंडूत १५० धावा केल्या आणि इंग्लंडच्या बेन मेयेसचा विक्रम मोडला. मेयेसने स्कॉटलंडविरुद्ध ९८ चेंडूत १५० धावा केल्या होत्या.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये ५९ चेंडूत १५० धावा केल्या होत्या

वैभव सूर्यवंशीने यापूर्वी विजय हजारे ट्रॉफीमध्ये ५९ चेंडूत १५० धावा केल्या होत्या आणि लिस्ट ए मध्ये सर्वात जलद १५० धावा करण्याचा विक्रम केला होता. याआधी एबी डिव्हिलियर्सने २०१५ च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध ६४ चेंडूत १५० धावा केल्या होत्या. या खेळीसह वैभव सूर्यवंशी २०२६ च्या अंडर-१९ विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही बनला. त्याने ४४९ धावा केल्या आहेत. त्याने ४१ चौकार आणि ३० षटकार मारले आहेत.

मॅनी लुम्सडेनच्या गोलंदाजीवर वैभव सूर्यवंशीला थॉमस रीव्हने झेलबाद

१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मॅनी लुम्सडेनच्या गोलंदाजीवर वैभव सूर्यवंशीला थॉमस रीव्हने झेलबाद केले. वैभवने ३२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पुढील २३ चेंडूत त्याने शतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने पुढील ५० धावा फक्त १६ चेंडूत पूर्ण केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts