Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणेकरांनो सावधान! शिवजन्म उत्साह निमित्त शहरातील महत्त्वाचे रस्ते बंद, वाहतुकीत मोठे बदल
Pune

पुणेकरांनो सावधान! शिवजन्म उत्साह निमित्त शहरातील महत्त्वाचे रस्ते बंद, वाहतुकीत मोठे बदल

Changes in Pune traffic
203

Changes in Pune traffic : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरात उद्या, मध्यवर्ती भागातून मिरवणुका काढण्यात येणार असून, मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातीली महत्त्वाचे आणि रहदारीचे रस्त्यांच्या वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे घराच्या बाहेर पडण्यापूर्वी पुणेकरांनी पर्यायी रस्त्याची माहिती मिळवणे आवश्यक आहे. लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता; तसेच परिसरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक वाढून कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. गुरुवारी (१९ फेब्रुवारी) सकाळी सातपासून सायंकाळी गर्दी संपेपर्यंत मध्यवर्ती भागात वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे.

हेही वाचा – ‘राजकीय लोक व्हिएसआर कंपनीवर मुद्द्याम कारवाई करत नाहीत’; रोहित पवारांचा खळबळजनक दावा..

असे असणार वाहतूकीत बदल

शिवाजी रस्ता : जिजामाता चौकातून शिवाजी रस्त्यामार्गे स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौक – जंगली महाराज रस्ता – खंडुजीबाबा चौक – टिळक चौक – टिळक रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे. गणेश रस्त्याने फडके हौद चौक व जिजामाता चौकाकडे येणारी वाहतूक दारूवाला पूल चौकातून पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल

केळकर रस्ता : केळकर रस्त्यामार्गे अप्पा बळवंत चौकातून जोगेश्वरी मंदिर चौकामार्गे बुधवार चौकाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येईल. लक्ष्मी रस्त्यावर मिरवणूक सुरू असताना सोन्या मारुती चौकातून पुढे जाईपर्यंत लक्ष्मी रस्त्यावरील वाहने संत कबीर चौक (समर्थ विभाग) मार्गे वळविण्यात येतील.

पुरम चौकातून बाजीराव रस्त्यामार्गे शिवाजीनगरकडे

पुरम चौकातून बाजीराव रस्त्यामार्गे शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांनी पुरम चौक – टिळक रस्ता – अलका टॉकीज चौक – एफ. सी. रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे. मिरवणूक सुरू झाल्यानंतर अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे व बाजीराव रस्त्याने फुटक्या बुरुजाकडे जाणारी वाहतूक केळकर रस्त्यामार्गे सरळ पुढे वळविण्यात येईल. मिरवणुका गाडगीळ पुतळा पास होईपर्यंत सर्व वाहने सावरकर भवन पूल – बालगंधर्वकडून इच्छितस्थळी जातील. मिरवणुका गाडगीळ पुतळा येथून पुढे जाईपर्यंत शनिवारवाड्याकडे जाणारी वाहतूक कॉसमॉस बँक जंक्शन – बालगंधर्व – टिळक पूलमार्गे वळविण्यात येईल. स. गो. बर्वे चौकातून महापालिका भवनाकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौक – जंगली महाराज रस्ता – झाशी राणी चौक येथून इच्छितस्थळी जावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts