Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • गुन्हा
  • इंदौर हत्या प्रकरण : “काय कराल जाणून?” हैवान आरोपीच्या चेहऱ्यावर विकृत हास्य..
Top News

इंदौर हत्या प्रकरण : “काय कराल जाणून?” हैवान आरोपीच्या चेहऱ्यावर विकृत हास्य..

Indore murder case

Indore murder case  : मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये (Indore Crime Case) एका एमबीएच्या विद्यार्थिनीची झालेली निघृण हत्येमुळे (Brutal murder of MBA student) संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणातील आरोपी पीयूष धामनोतिया हा तिचा वर्गमित्रच होता. या हैवानाने फक्त प्रेयसीचा जीवच घेतला नाही, तर तिच्या मृतदेहाची विटंबना करून अघोरी कृत्येही (Desecration of corpses and atrocities) केली आहेत. अटकेनंतर या आरोपीला केलेल्या कृत्याचा किंचितही पश्चाताप नसल्याचे (The accused has no remorse) त्याच्या चेहऱ्यावर दिसून आले. तेव्हा पत्रकारांनी विचारले, तू हत्या का केलीस? त्यावर तो हसत म्हणाला, “जे झालं ते झालं. सोडून द्या, काय कराल जाणून? वेळ येईल तेव्हा सगळे सांगेन.”

हेही वाचा – भिगवण तरुणी अपहरण! हिंदू धर्माचा भंग की प्रेमाचा रंग, तरुणी अन् आरोपीचे काॅल, मेसेज समोर..

सविस्तर माहितीनुसार, १० फेब्रुवारी रोजी पीडित विद्यार्थिनी आपल्या वडिलांसोबत घरातून निघाली होती. पीयूषने तिला अभ्यासाच्या बाबतीत काही प्रकरणांवर चर्चा करण्यासाठी आणि सरप्राईज गिफ्ट देण्यासाठी रुमवर बोलावले. रुमवर आल्यानंतर नराधम आरोपीने तिचे हात-पाय बांधले आणि डोळ्यांवर पट्टी बांधली. विद्यार्थिनीला थोडीही शंका आली नाही. तिला वाटले की, तो काहीतरी सरप्राईट गिफ्ट देणार आहे म्हणून डोळ्यावर पट्टी बांधत आहे. प्रियकर असल्याने त्याने हातपाय बांधले तर तिला वाटले थट्टा, मस्करी करत आहे. मात्र, हैवान आरोपीच्या मनात काही वेगळेच शिजत होते. त्याने डोळे बंद आणि हातपाय बांधल्यावर विद्यार्थिनीच्या तोंडात पॉलिथिन बॅग कोंबून गळा आवळून तिची हत्या केली. शहरातील द्वारकापुरी पोलिस स्टेशन परिसरातील एका बंद घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार लोकांना मिळाली. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर, घरात एका २४ वर्षीय तरुणीचा नग्न मृतदेह आढळला.

११ आक्षेपार्ह व्हिडिओ कॉलेजच्या ग्रुपवर

आरोपीने हत्येनंतर विद्यार्थिनीचा मोबाईल स्वतःकडे ठेवला होता. त्याने तिच्या मोबाईलमधील ११ आक्षेपार्ह व्हिडिओ कॉलेजच्या ग्रुपवर आणि तिच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर शेअर केले. पीडितेचे चारित्र्यहनन करून स्वतःचा गुन्हा लपवण्याचा हा त्याचा विकृत प्रयत्न होता. इतकेच नाही तर त्याने तिच्या बहिणीला मेसेज केला की, “बाबांना सांग ती आता कधीच घरी परतणार नाही.”

विद्यार्थिनीच्या मृतदेहावर चाकूने वार

हत्येनंतर पीयूष इथेच थांबली नाही. आरोपीने विद्यार्थिनीच्या मृतदेहावर चाकूने वार केले. त्यानंतर त्याने मृतदेहाशेजारी बसून मद्यपान केले. हत्येनंतर तो आधी गोव्याला आणि नंतर पनवेलला पळाला. तिथे त्याने हॉटेलमध्ये बसून युट्यूबवर आत्मांशी कसं बोलायचं? हे सर्च केले आणि मृताच्या आत्म्याला बोलावण्यासाठी तांत्रिक विधी करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पीयूषला गोवा-महाराष्ट्र सीमेवर चालत्या ट्रेनमधून अटक केली. पोलीस या प्रकरणातील तांत्रिक पुरावे आणि जप्त केलेले साहित्य यांच्या आधारे खटला मजबूत करत आहेत.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts