Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुण्यात ४ वर्षीय चिमुकलीचे अपहरण व लैंगिक अत्याचार, सीसीटीव्हीमुळे आरोपी ताब्यात
Pune

पुण्यात ४ वर्षीय चिमुकलीचे अपहरण व लैंगिक अत्याचार, सीसीटीव्हीमुळे आरोपी ताब्यात

Sexual assault

Sexual assault  : पुणे रेल्वे स्थानक परिसरात चार वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – बदलापूरात स्त्री बीजाची बेकायदा विक्री करणारे रॅकेट उघड; तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुटुंब हे मध्यप्रदेश राज्यातील खंडवा येथील रहिवासी असून रेल्वेने प्रवास करत पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ३ वर आले होते. दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे १:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कुटुंबीय झोपलेले असताना मुलीचे वडील बाथरूमसाठी उठले असता चार वर्षांची मुलगी बेपत्ता असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

कुटुंबीयांनी तातडीने शोध घेतला, मात्र मुलगी सापडली नाही. त्यानंतर त्यांनी तत्काळ पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे येथे धाव घेतली. पोलिसांनी स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक इसम मुलीचा हात धरून नेताना दिसून आला.

सदर आरोपी हा प्रवाशांना सामान उतरविण्यास मदत करत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवून आरोपी व मुलगी यांना रेल्वे परिसरातून ताब्यात घेतले. आरोपी हा मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चिमुकलीने प्राथमिक चौकशीत “कुरकुरे देतो” असे सांगून आरोपी तिला घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगितले. तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळून आले असून तिला पोटदुखीची तक्रार होती. त्यानंतर पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी तिला रुग्णालयात दाखल केले.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम १३७(२) व ६५(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांचे आवाहन रेल्वे स्थानकासारख्या गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांवर सतत लक्ष ठेवावे, अनोळखी व्यक्तींकडून दिल्या जाणाऱ्या वस्तू स्वीकारू देऊ नयेत, तसेच संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts